धुळे : गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने राज्याला ओरबाडून काढलं असून स्वातंत्र्यानंतरचं हे सर्वात भष्ट सरकार ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना अनिल गोटे यांनी विविध विकास कामांचा उल्लेख केला आहे. 'गेल्या पाच वर्षांत सरकारी कामात हजारो कोटींचे घोटाळे झाले आहेत. शिवस्मारक, समृद्धी महामार्ग या कामांत फडणवीस सरकारने हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. यासर्व घोटाळ्यांची माहिती मी काढली आहे', असं अनिल गोटे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले फडणवीस दिलेला शब्द पाळत नाहीत. राज्यातील प्रत्येक गावात त्यांनी गोंधळ घातलाय. त्यामुळे लोकांचा विश्वास उडाला आहे, असेही गोटे म्हणाले. तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी दोन अंकी जागा मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या