इंग्रज भारतात व्यापार करायला आले होते. आपले व्यापाराचे साम्राज्य पसरवण्यामध्ये जे कोणी आडकाठी करत होते. त्यांच्यावरच त्यांनी अत्याचार केले. उलट त्यांनी इथल्या बहुजनवर्गाला समान वागणूक दिली. त्यांच्यामुळे बहुजन वर्ग शिक्षित झाला. पिढ्यान् पिढ्या ज्यांना शिक्षणाचे अधिकार इथल्या समाज व्यवस्थेने नाकारले होते. ते इंग्रजांनी तोडून टाकले. इंग्रजांनी सैन्यात भरती करताना व्यक्तीची क्षमता पाहिली त्याची जात किंवा धर्म नाही. इतिहास वाचताना आपल्याला कधीच बाबासाहेब ,महात्मा फुले ,राजर्षी शाहू महाराज यांनी इंग्रजांना कधीच विरोध केलेला आढळत नाही. याचे कारण म्हणजे इंग्रजांमूळेच इथल्या बहुसंख्यांक भारतीयांना त्यांचे हक्क मिळाले होते. त्यामुळे या महापुरूषांना देशद्रोही म्हटले गेले.
बाबासाहेबांनी एका भाषणात म्हटले आहे की इंग्रजांची सत्ता अजून १०-१५ वर्ष पाहीजे होती. हे त्यांचे व्यक्तव्य गांधी, नेहरू व टिळक यांना मागासवर्गीयांमधे बाबासाहेबांची देशद्रोहाची छवी बनवण्यास उपयोगी पडली. गांधीने त्याच्या पूर्ण आयुष्यात एकदाच आमरण उपोषण केले आणी तेही बाबासाहेबांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली तेव्हाच.जर ती मागणी पूर्ण झाली असती तर दलित समाज बामण समाजासोबत वावरू शकला असता आणि बामण समाजाचे वर्चस्व कमी झाले असते.
शहीद भगत सिंग ,राजगुरू, सूखदेव यांची फाशीची शिक्षा गांधी, नेहरू, टिळक हे रद्द करू शकत होते. परंतू भारतीयांना इंग्रजांविरूध्द करण्यासाठी आणि बामणी सत्ता प्रभुत्व करण्यासाठी त्यांना फाशी होणे गरजेचे होते. इंग्रजांची सत्ता १५० वर्षे होती पण पोर्तुगीजांची सत्ता तर ४५१ वर्षे होती. मग त्यांच्याविरूध्द उठाव का झाले नाही ? याचे कारण म्हणजे पार्तुगिजांनी फक्त व्यापार केला .त्यांनी कधीच धर्मावर बोट ठेवले नाही . याउलट इंग्रजांनी धर्माला विरोध केल्याने बामणांचे वर्चस्व कमी होईल अशी भिती होती. म्हणून फक्त इंग्रजांविरूध्दच उठाव झाल्याचे आपणास दिसते.
बाबासाहेबांना त्रास देणाऱ्यांमधे गांधी पहिले ,टिळक दुसरे आणि रानडे तिसरे होते. इतिहासामध्ये या तिघांच्या बद्दल तुम्हाला एकही वाईट गोष्ट लिहीलेली सापडणार नाही उलट त्यांचे कार्य गोडगुलाबीने लिहीलेले जातात. बाबासाहेब, फुले, गाडगे महाराज, शाह महाराज यांचे कार्य फक्त समाजसुधारकाच्या एका धड्यात सिमीत केले गेले. झाशीच्या राणीने कधीच इंग्रजांविरूध्द बंड केले नाही .पण जेव्हा तिच्या मुलाचा दत्तकवारसा हक्क इंग्रजानी नाकारला तेव्हाच ती उठावात सामील झाली. तरी तिच्या उठावाच्या कहाण्या खूप सांगितल्या जातात. पण सम्राट अशोकाचे कार्य कधीच सांगीतले जात नाही. बाबासाहेबांनी फक्त दलित लोकांसाठी कार्य केले असे आपणास इतिहासात दिसते . जर बाबासाहेब फक्त दलितींसाठीच झटले तर मग राज्यघटनेतील पहिली आरक्षणाची कलम OBCसाठी का लिहीली? यावरून दिसते की बाबासाहेबांनी भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी प्रत्येक समाजासाठी कार्य केले.
या सर्व गोष्टी तमाम भारतीयांपर्यंत पोहोचवण्यात पुरोगामी चळवळीतील मंडळी कमी पडली. आणि आज भारताला पुन्हा एकदा संविधान सांगण्याची गरज भासू लागली. मागील ६० वर्षात संविधानाबद्दल कधीच कुठे प्रचार आणि प्रसार करण्यात येत नव्हता. २६ जानेवारी म्हणजे सत्यनारायणाची महापूजेचा दिवस असाच एक प्रघात निर्माण करून ठेवण्यात आला होता. आजही काही प्रतिगामी मंडळी त्यासाठी आग्रही आहेत. भारतात दोन विचारधारा क्रांती व प्रतिक्रांतीच्या पथदर्शक आहेत. पुरोगामी चळवळ क्रांतीच्या मार्गावर चालणारी तर आरएसएसची प्रतिक्रांतीच्या दिशेने सातत्यपूर्ण मार्गक्रमण करणारी. आरएसएसला इथली संविधानिक लोकशाहीची, स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाची व्यवस्था उध्वस्त करायची आहे व त्या दिशेने ते पाऊले टाकत आहेत.
तर दुसरीकडे पुरोगामी चळवळीला स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाचे संवर्धन, पालनपोषण व संरक्षण करणारी संविधानिक लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. असे असतांनाही ही चळवळ गर्तेत अडकली आहे. -एकीकडे आरएसएसच्या शाखा वाढत आहेत. वाढणाऱ्या शाखांमध्ये तरूणाईचा भरणा होत आहे. तरूणांना आकर्षित करून आरएसएस पुढच्या प्रतिक्रांतीच्या ५०-६० वर्षाची तजविज आजच करून ठेवीत आहे. तर दुसरीकडे पुरोगामी चळवळ काही मोजक्या वय संपत चाललेल्या लोकांपर्यंत मर्यादीत होत चालली आहे. तरूणाईला आकर्षित करणारा कृतिकार्यक्रम पुरोगामी चळवळीच्या म्होरक्यांकडे दिसून येत नाही.
कुठल्याही संघटनेचे वय वाढत असतांनाच तरूणाईच्या बळावर त्या संघटनेचे आयुष्य दुपटीने वाढत जात असते. पण तरूणाईपासून दूर जाणारे संघटन प्रौढावस्थेत म्हातारे होत जाते. क्रांतीला प्रतिक्रांतीसोबतचे शितयुद्ध जिंकायचे आहे. त्यासाठी क्रांतीच्या नायक शिलेदारांची ही जबाबदारी आहे की पुरोगामी चळवळीत उपकार म्हणून कार्य करण्यापेक्षा जबाबदारी म्हणून कार्याला लागा. प्रतिक्रांतीवर मात करायची असेल तर शिस्त व संयम पाळायला शिका. एखादी कृती करून समाजमन जिंकले की लगेच नायक होण्याची महत्वाकांक्षा बाळगू नका. व लगेच पुरोगामी चळवळीचे स्वाभिमानी नेतृत्व करणाऱ्यांवर प्रश्नांकित वलय निर्माण करू नका. तुम्ही एका जबाबदारीचे निर्वहन करून चळवळीत आपले योगदान दिले.
असेच प्रत्येकाने आपआपली जबाबदारी म्हणून पुरोगामी चळवळीत योगदान दिले तरच चळवळीचे आयुष्य चिरकाळ टिकेल. मोर्चे काढली, चार माणंस जमवली म्हणजे चळवळ चालत नसते. तत्कालीन मुद्यांवर लढणे म्हणजेच चळवळ नव्हे. तर तत्कालीन मुद्यांवरील लढ्याचा भविष्यावर दूरगामी परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन संयमी लढ्याची आखणी करणे चळवळीच्या शिलेदारांचे काम आहे. ते व्यवस्थितपणे आणि निस्वार्थीपणे केले तरच भारत प्रजासत्ताक बनेल...
0 टिप्पण्या