उद्योजकांनी योगदान महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिली. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उद्योग क्षेत्रातल्या प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी उद्योग संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित Industry होते. राज्याला औद्योगिक VcHha आणि आर्थिकदृष्ट्या अग्रसेर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा ठरला आहे. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवर उद्योजकांची उपस्थिती होती. या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया या मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्योजकांशी संवाद साधताना म्हणाले की, आमचे सरकार हे कुठल्याही विकास कामांना स्थगिती देणार नसून उलटपक्षी महत्त्वाचे प्रकल्प अधिकाधिक जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे सरकार केवळ आमचे नसून तुमचे आमचे नसून तुमचे सगळ्यांचे आहे आणि त्यामुळे शेती, शिक्षण, रोजगार या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी उद्योजकांनी मोठे योगदान द्यावे. गेल्या काही वर्षांमध्ये काही कारणांमुळे काही उद्योग राज्याबाहेर गेले असतील परंतु आता एकही उद्योग बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे बाहेरील राज्यांमधील चांगले उद्योग देखील महाराष्ट्रामध्ये कसे सुरु होतील यासाठी त्यांना आकृष्ट करण्यात येईल. जमिनीची किंमत, वीज दर, रस्त्यांची तसेच इतर पायाभूत सुविधांची परिस्थिती आणि विविध परवानग्या गतीने मिळणे यासंदर्भात उद्योग विभागाला तसेच संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश देण्यात येऊन त्याप्रमाणे अडचणी दूर करण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.
0 टिप्पण्या