ठाणे स्थानकातील शेकडो वर्ष जुन्या विहिरींचा इतिहास उलगडणार...
आमदार संजय केळकर यांनी केला पाहणी दौरा..
ठाणे
पाहिली रेल्वे सुरु झाली त्यावेळी ठाणे स्थानकाच्या उभारणीच्या वेळी प्रवाशांकरिता पाणी पिण्याकरिता मिळावे याकरिता स्थानकाच्या पूर्वेला विहीर बांधण्यात आली होती. ह्या शेकडो वर्ष जुन्या विहिरीचा इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर होता. रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत आमंदार संजय केळकर यांनी विहिरींची पाहणी करून हि विहीर साफ करण्यात येऊन हिचे पाणी स्थानक परिसर स्वच्छतेकरिता मोठ्या प्रमाणात होईल असे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना पाहणी दौऱ्या दरम्यान दिले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, अमोल कदम, ठाणे रेल्वे व्यवस्थापक राजेंद्र वर्मा, स्टेशन मास्तर आर. के. मीना, उपस्थित होते.
रेल्वेची ही विहीर रेल्वेच्या पीडब्ल्यू विभागाच्या वतीने साफ करण्यात येऊन या विहिरीतील पाणी स्थानकाकरिता वापरण्यात येणार असून याकरिता मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक गोयल यांना देखील पत्र देणार असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या