Top Post Ad

१४० सदस्यांचे एकत्र कुटुंब

कर्नाटकमधील या कुटुंबात 7 पिढ्यांमध्ये कधीही वाटणी नाही, 
या कुटुंबात एक अपवाद वगळता सर्वांचे सरासरी वय 80 वर्षांच्या वर




धारवाड :


बंगळुरूपासून ५०० किमी अंतरावर धारवाड जिल्ह्यातील लोकूर गाव. भीमन्ना नरसिंगवर कुटुंब देशातील सर्वात मोठ्या संयुक्त कुटुंबांपैकी एक आहे. कुटुंबात १४० सदस्य राहतात. यात ८० पुरुष व ६० महिला आहेत. १८ वर्षांपर्यंत वय असलेले ३० जण आहेत. आम्ही येथे पोहोचलो तेव्हा घराच्या अंगणात सात-आठ चुलींवर अंघोळ करण्यासाठी पाणी गरम होत होते. एका खोलीतून पीठ गिरणीचा आवाज येत होता. विचारणा केली असता कुटुंबातील सदस्य मंजुनाथ यांनी सांगितले की, कुटुंबाकडे डाळ, हरभरा पीठ, मैदा व ज्वारी दळण्यासाठी स्वत:च्या दोन गिरणी आहेत. सर्वांचा स्वयंपाक एकाच वेळी तयार होतो. ते ही तीन वेळा. एकावेळी कमीतकमी ३०० ज्वारीच्या भाकरी बनवल्या जातात. ४० गायी आहेत, ज्या दररोज १५० लिटर दूध देतात. ६० लिटर दुधाचा वापर घरातच केला जातो. कुटुंबाकडे २०० एकर जमीन आहे. ९० वर्षीय ईश्वरप्पा सांगतात, सात पिढ्यांपूर्वी कुटुंब महाराष्ट्रातील हटकल अन्गदामधून येथे स्थायिक झाले. तेव्हापासून कोणतीही वाटणी झालेली नाही. या काळात अनेक संकटे आली व गेली. परंतु कुटुंब एकत्र राहिले. १९९८ पासून सहा वर्षे सतत दुष्काळ होता. कर्ज काढावे लागले, जे वाढल्यामुळे ४ कोटींवर पोहोचले आहे. आम्ही यावर मार्ग शोधला आहे. आम्ही १५ एकर जमीन विकणार आहोत. येथे २० ते २५ लाख रुपये प्रतिएकर असा भाव आहे. शेती करणारे देवेंद्र सांगतात, दररोज शेतात ५० मजूर काम करतात. लहानसहान खर्च लक्षात येत नाही. पण मोठे खर्च खूप होतात. कुटुंबात दरवर्षी दोन ते तीन लग्ने होतात. एकावर १० लाख खर्च येतो. शिक्षणावरही खर्च केला जातो. सून पद्मा अभिमानाने सांगतात, कुटुंबात ८० वयापेक्षा कमी वयात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. दरवर्षी मुंबई, बंगळुरू, हुबळीतील १५ ते २० विद्यार्थी कुटुंबावर संशोधन करतात. दिग्दर्शक केतन मेहता यांनी चित्रपटही तयार केला आहे.


गोल्डन रूल, एकत्र राहण्याची देतात प्रेरणा


स्वयंपाक बनेल एकाच चुलीवर - वाढत्या गरजेमुळे कुटुंबाची ६ घरे आहेत. संपूर्ण घराचा स्वयंपाक १९७५ मधील जुन्या स्वयंपाक घरात हाेताे.
सगळ्यांची जबाबदारी ठरली आहे - ३० मुलांचा अभ्यास २० किमी लांब राहणारे मंजूनाथ घेतात. ७५ वर्षांची कस्तुरी स्वयंपाक बघते. सुना-मुली मदत करतात. देवेंद्र शेतीचे काम बघतात. पद्मा महिला तर धर्मेंद्र पुरुष कामगारांकडे लक्ष देतात.
सगळे एकत्र बसून तक्रारी साेडवतात - एकत्र बसून तक्रारींचे निवारण करतात. ९० वर्षांच्या ईश्वरप्पांचा निर्णय अंतिम असताे. त्यांचे म्हणणे काेणीही टाळत नाहीत.
बालपणीच साधेपणा शिकवतात - कुटुंबाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा.कमी साधनांनीदेखील जगता येते व प्रत्येक समस्येवर उपाय शाेधता येताे हे अगदी लहानपणापासूनच मुलांना शिकवले जाते.
दसऱ्याला सर्व कुटुंब येते एकत्र - नाेकरी निमित्त बाहेर राहणारे कुटुंबातील ७० सदस्य दसऱ्याला जरूर गावी येतात. बाहेर राहणारा सदस्य उन्हाळ्यात आला नाही असे कधी घडलेले नाही.
टीव्ही आणि माेबाइलपासून मुले दूर - कुटुंबात केवळ २ टीव्ही आहेत. मुलांना कधीच टीव्हीची गरज भासत नाही. माेबाइल व टीव्हीपासून दूर ठेवले जाते.


अमितकुमार निरंजन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com