Top Post Ad

जिल्हा परिषदेच्या शाळेत बोगस शिक्षक 

जिल्हा परिषदेच्या शाळेत बोगस शिक्षक 



वाडा : 
वाडा तालुक्यातील तीलमाळ गावी जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील शिक्षिका आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शाळेमध्ये येत असते. इतर दिवस बारावी शिक्षण झालेला तरूण या शाळेत शिक्षक म्हणून  विद्यार्थ्यांना शिकवत असतो. त्या तरुणाला ही शिक्षिका स्वत पगार देत असते, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  
वाडा तालुक्यातील तीलमाल हा गाव अतिदुर्गम, डोंगराळ भागात असल्यामुळे आणि कुठल्याही रहदारीच्या सुविधा नसल्यामुळे या गावातील शाळेमध्ये पहिल्या वर्गात दोन तर दुसरीच्या वर्गात तीन अशी मिळून  पाच विद्यार्थी संख्या आहे. या शाळेतील शिक्षिका आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येत असते, असे गावातील नागरिक सांगतात. इतर दिवशी शेजारील गावातील बेरोजगार बारावी शिक्षण घेतलेला तरुण मुलांना शिकवत असतो. त्यामुळे या प्रकाराला संतापून या गावातील पालकांनी आपल्या मुलांना इतर गावातील शाळेत टाकले आहे.  जिल्हा परिषद शाळा या बिकट अवस्थेतून जात असताना घटती पटसंख्या याबाबतीत प्रश्न भेडसावत असताना या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.
         शासनाचे धोरण आहे की तळागाळापर्यंत मुलाना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे व तो त्यांचा शिक्षणाचा अधिकार आहे,त्यांना शिक्षणापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. परंतु या शाळेत शिक्षक येत नाही एवढा मोठा धक्कादायक प्रकार घडत असताना ,केंद्र प्रमुख ,गट शिक्षण अधिकारी यांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.        तीलमाळ हा अतिदुर्गम  डोंगराळ भाग असल्यामुळे या गावातील शिक्षीका ही दुरवरून येत असल्यामुळे तिने आपल्या सोई नुसार शिक्षण व्यवस्था धाब्यावर बसवून शाळेत येत असते. पण या शिक्षीकेला मुलाच्या भवितव्यांशी खेळ करत व शासनाच्या भोंगळ कारभाराचा फायदा घेत असल्याची चर्चा पालकवर्ग करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com