मुलाकरम (ब्रेस्ट टॅक्स)
सोळाव्या सतराव्या शतकात केरल मधील त्रावणकोर येथे क्षुद्र जातींतिल स्त्रियांना त्यांची स्तन झाकन्यासाठी ब्रेस्ट टॅक्स म्हणून एक कर आकारल्या जात असे, त्याला तेथील स्थानीय भाषेत "मुलाकरम" असे म्हणत असत.
साहजिकच बहुतेकांना तो टॅक्स परवडनारा नव्हता म्हणून तेथील स्त्रिया स्तनान्ना उघड़े ठेवत असत.
अशिच एक नांगेली नावाची स्त्री तेथे राहत असे, विद्रोही विचारांनी भारवलेली नांगेली त्या अमानुष, रानटी, विषमतेच्या कायद्याला तोडन्यासाठी सज्ज झालेली होती.
"मुलाकरम ही देणार नाही आणि स्तनही झाकनार" म्हणत तिने स्तन झाकुन व्यवस्थेला थेट आव्हान दिले. हे त्या विषमतावादी व्यवस्थेला रुचनार नव्हतं, त्यासाठी त्यांनी मुलाकरम घेण्यासाठी तीच घर गाठल. नांगेलीने स्वतःचे स्तन कापून त्यांच्यासमोर ठेवले. रक्तस्राव जास्त झाल्यामुळे तिचा मृत्यु झाला पण ती त्या नीच कायद्याला मोडून काढनारी रणरागिणी ठरली. आजही केरलात तिच्या मूर्तिची पूजा केली जाते, पण दुर्दैवाने इतका मोठा इतिहास जो सम्पूर्ण भारताला माहित असायला हवा होता तो केरल पुरता सीमित राहून गेला.
यावरती उत्कृष्ट शॉर्ट फिल्म ही आहे बघा आणि माहित करून घ्या
0 टिप्पण्या