नगरसेवक नरेश मणेरा यांच्या महाराष्ट्र महोत्सवाची सांगता
महाराष्ट्र महोत्सवाने भारतीय संस्कृती जपण्याचे काम केले ...... नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
ठाणे
गेले सात वर्षांपासून ठाणेवासियांच्या मनात घर करून बसलेल्या महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती जपण्याचे काम होत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री,ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रोड येथे आयोजित महाराष्ट्र मोहत्सवच्या समारोप कार्यक्रमात दिली.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील ठाणे महापालिका मैदानात शिवसेना घोडबंदर विभाग व वैष्णवी प्रतिष्ठान यांच्या वतीने व नगरसेवक नरेश मणेरा यांच्या पुढाकाराने २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान " महाराष्ट्र महोत्सव" आयोजित करण्यात आला होता यामध्ये अभंग रिपोस्ट, नृत्य स्पर्धा,इश्क सुफियाना गजल,विशाल कोठारी लाईव्ह,खेळ पैठणीचा,भक्तीरंग,असे विविध कार्यक्रम झाले. या महोत्सवाचा समारोप रविवारी नगरविकास मंत्री,ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडला यावेळी खासदार राजन विचारे,शिवसेना उपनेते अनंत तरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे,आयोजक नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका नम्रता घरत, नगरसेविका साधना जोशी, शाखाप्रमुख राजेंद्र महाडिक, विभागप्रमुख मुकेश ठोमरे, शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे, आदी सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गेले सात वर्षांपासून ठाणेवासियांच्या मनात घर करून बसलेल्या महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती जपण्याचे व ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागण्याचे काम होत आहे. ठाणेकर देत असलेल्या पाठिंब्यामुळेच शहराचा विकास होतो आणि यापुढे देखील ठाण्याचा विकास झपाट्याने करण्यासाठी काम आपण करता असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.ठाणे शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला पाहिजे यासाठी काळू धरणाची निर्माती करण्यात येत असून वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागप्रमुख अकबर शेख,महेंद्र पाटील,शाखाप्रमुख जयवंत म्हात्रे, गुळवी , जोशी, रॉबर्ड लाझरस,उपशाखाप्रमुख दीप भोईर, निटेश पाटील, अतुल पाटील,शाखाप्रमुख दीपक साळवी, जितू राऊत, सागर मोहिते, बिन्नी नंदा आदी सह महिला पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी यांनी मेहनत घेतली
0 टिप्पण्या