शिवराय गेले... शंभूराजेही गेले.... शिवरायांच्या 'शिवराज्याचे' पेशवाई मध्ये रूपांतर झाले. पेशवाई मध्ये शिवरायांचे व तुकोबारायचे नाव घ्यायलाच बंदी होती तर मग शिवरायांची समाधी नेमकी कुठे आहे. कसं माहित होणार. मग शिवजयंती तर दूरच राहिली. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंना छत्रपती शिवरायांची समाधी रायगड किल्ल्यावर असल्याची लेखी माहिती मिळाली आणि ते तडक रायगडावर गेले. तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्याना दगडांचा विविध आकारात रचलेला थर दिसला. जवळ जाताच हीच आपल्या राजाची समाधी आहे हे त्यांनी जाणले. त्या समाधीची अवस्था पाहून त्यांना गहिवरुन आले. काट्यांनी-धूळ-मातीने भरलेल्या समाधीला फुलेंनी स्वच्छ केले व त्यावर सुमने वाहून त्यांना मानवंदना दिली. मात्र गो-ब्राह्मण प्रतिपालकाची बिरुदावली बहुजन राजाला चिकटवणाऱ्यांनी महाराजांची समाधी अंधारात का ठेवली. का नाही फुलेंच्या आधी महाराष्ट्रात शिवरायांचा जयजयकार दुमदुमला.
ही गोष्ट गडाच्या खाली असलेल्या गावच्या ग्राम-जोश्याला कळली व तो आपले जानवे हलवित समधीजवळ आला. एका कुणबट राजाची पुजा करतो! मला शिधा-दक्षिणा द्यायचे राहिले बाजुला असे म्हणत त्याने समाधीवर टाकलेल्या फुलांना लाथेने उधळून लावले. महात्मा फुलेंनी त्याचा गळा पकडला व त्याला गडावरुन खाली फेकून देईल असे धमकावले. हे ऐकताच त्याने पळ काढला. नंतर राष्ट्रपिता महात्मा फूले पुण्यात आले व पुण्यातील गंजपेठेत लक्ष्मीनारायन थियेटरच्या चौकात जगातील सर्वांत पहिला शिवजन्मोत्सव दहा दिवस साजरा केला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1869. या कार्यक्रमाची आजही लेखी नोंद आहे. तेव्हा बाळ टिळकांचे वय फक्त 13 वर्षे होते... आणि तेव्हापासूनच खरे तर शिवरायांचा जयंती उत्सव 10 दिवस साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. जी क्रांतिबा फुले यांनी सुरु केली. जिवित असेपर्यंत जोतिराव फुले दरवर्षी 10 दिवसांची शिवजयंती साजरी करायचे,
मात्र 1890 ला महात्मा फुले यांचे निधन झाले व 1896 ला टिळकांनी 'तिथी' नुसार शिवजयंती साजरी केली व 'तारखे' नुसार फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंतीला बंद पाडण्याचे षडयंत्र चालविले.म्हणजे मुळ शिवरायांच्या जयंती मध्ये 'तिथी' चा वाद जर कोणी घातला असेल तर तो म्हणजे बाळ टिळकांनीच... टिळकांनी 1896 नंतर तिथी नुसार शिवजयंती साजरी करीत असताना शिवरायांच्या फोटोसोबत पेशवे नानासाहेब फडणवीसचा फोटो ठेवण्याचा प्रघात सुरु केला. ज्याने शिवरायांच्या शिवशाहीच्या विरोधात असलेल्या पेशवाईला टिकवून ठेवण्याचे काम केले तोच फडणवीस ... मात्र अशा ह्या टिळकांनाच पाठ्यपुस्तकात 'शिवजयंती चे जनक' दाखवून राष्ट्रपिता ज्योतीराव फुलेंविषयी असलेला खरा इतिहास लपविलेल्या गेला. आजही टिळकच शिकविले जातात !!!
त्याच वर्षी टिळकांनी गणेश उत्सवाला पण सुरुवात केली ते शिवजयंतीला मागे टाकण्यासाठीच! याआधी गणपती फक्त एका विशिष्ट वर्गाच्या समाजाच्या घरात होता, तो टिळकांनी रस्त्यावर आणला व दहा दिवसांचा गणेश उत्सव सुरू केला व दहा दिवस चालणाऱ्या शिवजयंतीला तारखेच्या व तिथीच्या वादात अडकवून बंद पडण्यास सुरुवात केली व बुद्धीला न पटणाऱ्या कथा लोकांच्या माथी मारले ... एकाच वेळेला टिळकांनी गणेशोत्सव व तिथीनुसार शिवजयंतीला सुरुवात केली असल्यास आज संपुर्ण भारतात गणेशोत्सव साजरा केला जातो पण शिवरायांची शिवजयंती महाराष्ट्रात एक दिवस सुध्दा व्यवस्थितरित्या साजरी केल्या जात नाही...
खरे तर राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या शिवजयंतीला बंद पाडण्यासाठीच व लोकांना शिवरायांचा विसर पाडण्यासाठीच टिळकांनी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली...कारण उघडपणे लोकांना शिवजयंती बंद करा असे म्हणायची हिंमत ते करु शकत नव्हते, 'तारीख' संपुर्ण जगभर एकाच दिवशी असते म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती संपूर्ण जगभर साजरी केल्या गेली असती. म्हणुन संपूर्ण जगाला शिवरायांची ओळख न व्हावी म्हणुनच 'तिथी' चा खेळ टिळकांनी सुरु केला...कारण तिथी फक्त भारतात व तेही महाराष्ट्रातच बघितल्या जाते आणि ती सुद्धा बामणच बघतात ! म्हणजे शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेवणे हाच यामागचा हेतु होता व त्यात ते यशस्वी झालेच ! म्हणुन गणेशोत्सवाचा खरा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे... आमचे प्रेरणास्थान असलेल्या शिवरायांना या खोट्या इतिहासाच्या कारावासातून मुक्त करणे गरजेचे आहे. ज्या बहुजन महापुरुषांनी धार्मिक गुलामीच्या विरोधात स्वातंत्र्याचे आंदोलन चालविले तेच आंदोलन उभारून भारतीय बहूजन रयतेला स्वतंत्र करण्याची गरज आहे.
- कुळवाडीभूषण बहुजन-प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनीच शोधुन काढली...
- जगातील पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी साजरी केली...
- पहिले मराठी शिवचरित्र राष्ट्रपिता जोतिराव फुलेंनी लिहिले...किंमत - 6 आणे...
- शिवरायांवर पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला...
- शिवरायांचा खरा इतिहास महात्मा फुलेंनी लोकांसमोर आणला
0 टिप्पण्या