ठाण्यात आरोग्य जत्रेचे आयोजन
ठाणे
आधार रेखा प्रतिष्ठान आणि नाना पालकर स्मृती समिती यांच्यातर्फे ठाण्यात आरोग्यजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जत्रा शनिवार, २९ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता आणि रविवार १ मार्चला सकाळी १० वाजता, नौपाड्यातील सरस्वती मंदिर क्रीडा संकुलात भरणार आहे.
ठाण्यातील अग्रगण्य रुग्णालये, आरोग्य विषयक उत्पादन संस्था , तसेच अनेक सामाजिक सेवाभावी संस्था सहभागी होणार आहेत. येथे आरोग्याच्या जागरूकतेविषयी, आनंदी व निरोगी आयुष्यासाठी तसेच नागरिकांना आरोग्य साक्षर बनविण्यासाठी आरोग्य विषयक माहिती दिली जाणार आहे. या जत्रेदरम्यान शनिवारी ४ ते ८ विनामूल्य आरोग्यविषयक समुपदेशन, रविवारी सकाळी १० ते २ विनामूल्य रक्ततपासणी तसेच रविवारी दुपारी ३ ते ७ विनामूल्य आहारविषयक सल्लाही देण्यात येणार आहे
आधार रेखा प्रतिष्ठान हा एक कर्करुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी काम करणारा नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त न्यास आहे. तर नाना पालकर स्मृती समिती ही रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून कार्य करणारी संस्था आहे. या आरोग्यजत्रेमध्ये आरोग्य विषयात कार्यरत असलेल्या विविध संस्थांचा सहभाग असेल. अधिक माहितीकरिता ९८६९४६५१४४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या