कोट्यावधींच्या जुन्या नोटा जप्त
भिवंडी
एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बाद करून बराच अवधी झाला आहे. तरीदेखील अद्याप चालनातून बाद झालेल्या जुन्या नोटांचा साठा बाळगण्याचा घटना समोर येत आहे. ठाण्यातील शांतीनगर पोलिसांनी गस्ती दरम्यान जुन्या नोटा असलेली एक कोटी रुपये रक्कम जप्त केली आहे .
10 फेब्रुवारी रात्री 09 .30 वाजताच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्यातील पो उप निरी बाबासाहेब मुल्ला व त्यांचे पथक साईबाबा जकात नाका येथे गस्त घालत असताना स्वयंसिद्धी महाविद्यालया समोर दोन संशयित इसम काळ्या रंगाची बॅग घेऊन येत असताना त्यांना सहाय्यक पो उप निरी शेळके यांनी हटकले असता ते गोधळल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनी आपली नावे 1) गोपाळ माधव वारुळे वय 42 वर्ष तालुका धरणगाव जिल्हा जळगाव 2) अरुण त्र्यंबक पाटील वय 54 वर्ष रा वाणी विद्यालयासमोर कल्याण पश्चिम असे सांगितले. सदर इसमांच्या ताब्यातील बॅग ची तपासणी केली असता त्यामध्ये भारतीय चलनातून रद्द करण्यात आलेल्या 1000/- रुपये दराच्या 8000 नोटा व 500 /- रुपये दराच्या 4000 नोट असे एकूण एक कोटी रुपयांच्या नोटा मिळून आले. आरोपीच्या विरुद्ध शांतीनगर पोलीस ठाणे येथे The Specified Bank Notes Act 2017 चे कलम 3,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अदखलपात्र गुन्ह्याचा पुढील तपास पोउनिरी बाबासाहेब मुल्ला हे करीत आहेत . सदरची रक्कम कोणाची व कोणाकडे घेऊन जात होते याची तपासणी सुरु आहे.
0 टिप्पण्या