Top Post Ad

कुटुंबासह उध्वस्त झालेला रामभक्त

रामभक्ताचं कुटुंब झालं उध्वस्त 



उत्तरप्रदेश: 
सुरेश चंद्र बघेल हे राम मंदिर आंदोलनात भाग घेतलेले व्यक्ती आहेत. मात्र आज ते आज बेघर झाले आहेत. कुटुंब उध्वस्त झालं, पत्नी माहेरी निघून गेली. घर विकले गेले. कशाचा काहीच ठिकाणा नाही. आता उरलेलं आयुष्य एका गोशाळेत व्यतीत करत आहेत. १९९० साली अवघ्या तेवीस वर्षाचा असलेला युवक कट्टर हिन्दुत्ववादी म्हणून गणला जात होता. अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांच्या भाषणांनी प्रभावीत होऊन घरदार सोडून तो या आंदोलनात सहभागी झाला. मात्र आज बेघर होण्याची वेळ आली आहे.  मी हे सर्व रामासाठी केलं मी रामभक्त आहे.परंतु दुख या गोष्टीचे आहे की कधी काळी मान सन्मान देणारे हिंदुत्ववादी नेते आता ओळखही दाखवत नाहीत ना ढुंकूनही पहात नाहीत.अशी खंत ते बोलून दाखवतात.
गौरानगर कॉलनी, वृंदावन येथील रहिवाशी असलेले सुरेश चंद्र बघेल सांगतात की त्यांनी त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच अटक करून घेतली होती. म्हणजे कायद्याला शरण गेले होते.घातपात करण्यासाठी त्यांनी डायनामाईट सोबत नेले होते.आज लालकृष्ण अडवाणी दुर्लक्षित जरी असले तरी आपल्या कुटुंबासोबत ऐषारामात आयुष्य व्यतीत करत आहेत.सामान्य कार्यकर्ता मात्र असा बरबाद होतो हे इथे दुर्दैवाने ठळकपणे समोर आलेलं आहे. सुरेश बघेल काही दिवस फैजाबादच्या तुरुंगात होते. नंतर त्यांना लखनऊ येथे शिफ्ट केले गेले. त्यांच्यावर एनएसए लावण्यात आलेला होता.आणि टाडा अंर्तगत कारवाई करण्यात आली होती. दीड वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र पुन्हा अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. अशावेळी कुणीही हिंदुत्ववादी नेता त्यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही, अशी खंत आज ते व्यक्त करतात.
स्टोरी - अमर उजाला https://www.amarujala.com/…/ma…/hero-of-karsevak-is-homeless


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com