तुषार गांधी यांना निमंत्रण दिले म्हणून पुण्यात गांधी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमच रद्द
पुणे
प्रोग्रेसिव्ह इज्युकेशन सोसायटीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून ही राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित केली आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ही कार्यशाळा होणार होती. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी अचानक त्यांना निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी थेट ट्विटरवरूनट नाराजी व्यक्त केली. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी असून त्याविरुद्ध मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोललो असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येच संवाद नसल्याचं स्पष्ट झालंय. राज्यात महाघाडीचे सरकार आलं त्यात गृहखाते राष्ट्रवादीकडे असूनही पोलिसांच्या भूमिकेत बदल झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाई बाबत सरकारच्या मंत्र्यांमध्ये नाराजी उघड झाली आहे.
तुषार गांधी यांनी कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानंतर ट्विट करत म्हटलं आहे की, “मला निमंत्रित केल्यामुळे मॉडर्न कॉलेजला गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडण्यात आलं आहे. पतीतपावन संस्थेला जर मी हजर राहिलो तर कार्यक्रम बंद पाडू अशी धमकी देण्यात आली. गोली मारो गँग पुन्हा अॅक्शनमध्ये आली आहे”. ऐनवेळी कोणतंही कारण न देता हे चर्चासत्र रद्द करण्यात आलं. तुषार गांधी यांनी आयोजकांना धमकी मिळत असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा आरोप केला आहे. कार्यक्रमासाठी तुषार गांधी यांच्यासोबत पुणे गांधी भवनचे अन्वर राजन यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असा आरोप अन्वर राजन यांनी केला आहे.
अनिल देशमुख हे तुषार गांधी यांच्याशी बोलणार असल्याचंही आव्हाडांना सांगितलंय. तुषार गांधी यांचं पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयात भाषण ठेवण्यात आलं होतं. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणांवरून पुणे पोलिसांनी भाषणाला परवानगी नाकारली होती त्यावरून वाद निर्माण झालाय. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप व्यक्त केलाय. ते म्हणाले, तुषार गांधींचं भाषण होऊ दिलं नाही हे गंभीर आहे, गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. टँक्सी ड्रायव्हर एका प्रवाशाजवळ डफडी असल्याने आणि तो शाहीन बागविषयी बोलत असल्याने पोलीस स्टेशनली घेऊन गेला होता त्या घटनेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. काही संघटनांच्या दबावातून तुषार गांधी यांना देण्यात आलेल निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी पत्रकाद्वारे या कृत्याचा निषेध केला आहे. प्रॉग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी मात्र काही विद्यार्थ्यांना त्यांच्या आक्षेपार्ह भाषणाचे व्हिडीओ दाखवत निदर्शन करण्याचा इशारा दिला होता. परीक्षा सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूनच निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे.
0 टिप्पण्या