सन 2019-2020 च्या सुधारित अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर
ठाणे
ठाणे महापालिकेने सादर केलेल्या सन 2019-2020 चे सुधारित आणि सन 2020-2021 चे मूळ अंदाजखर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली असून महासभेच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रस्थावित केलेल्या सन 2019-2020 चे रु. 3,110 कोटी सुधारित अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. अंदाजखर्चात रु.49.30 लक्ष अखेरच्या शिल्लकेसह रु. 1842.11 कोटी महसुली खर्च व रु.1937.40 कोटी भांडवली खर्च असे एकूण रु.3780 कोटी रकमेचे खर्चाचे अंदाज स्थायी समितीस प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आले होते. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी सविस्तर चर्चा करून त्यात रु.306 कोटी वाढ करून रु.4086 कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडून महासभेच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
यामध्ये मालमत्ता कर, शहर विकास, जाहिरात, स्थावर मालमत्ता तसेच स्थानिक संस्था कराच्या थकबाकीपोटी वसुली अपेक्षित करून जमेत वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रस्थावित केलेली पाणी पुरवठ्याची दरवाढ अमान्य करण्यात आली असून कोणत्याही करवाढ व दरवाढीशिवाय सन 2020-2021 चा अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर केला आहे.
0 टिप्पण्या