Top Post Ad

राज्यातील 29 सरकारी विभागात दोन लाख 193 पदे रिक्त 

राज्यातील 29 सरकारी विभागात दोन लाख 193 पदे रिक्त 



मुंबई
राज्यातील 29 सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमधून गट “अ’, “ब’, “क’, “ड’ची 31 डिसेंबर 2019 अखेर दोन लाख 193 पदे रिक्त आहेत. त्यात सरळसेवेच्या एक लाख 41 हजार 329 पदांचा समावेश आहे. याखेरीज पदोन्नती मिळाल्यावर 58 हजार 864 पदांचाही यात समावेश होणार आहे. सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) येथील नितीन यादव यांना सामान्य प्रशासन विभागाकडून माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीतून हा उलगडा झाला आहे.
मागील सरकारतर्फे 72 हजार पदांची “मेगाभरती’ करण्यात येणार होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता काळात ही भरती थांबली. राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 हजार पदांच्या मेगाभरतीचा निर्णय घेण्यात आला. शिवाय बहुचर्चित महापोर्टलद्वारे होणाऱ्या भरतीवर फुली मारण्यात आली. नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने भरतीचे धोरण स्वीकारण्यात आले. अशातच, शिक्षकभरतीसाठी आंदोलकांशी संवाद साधत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांच्या मेगाभरतीचे संकेत दिले. मराठी भाषा विभागामुळे शिक्षकांच्या 20 हजार रिक्त जागा झाल्या. निवृत्तीमुळे दहा हजार पदे रिक्त होतील. ही सर्व पदे लवकरच भरण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com