Top Post Ad

अधिकार नसताना वाहतुकीकरिता पत्र दिल्याने "त्या" नगरसेवकावर कारवाईची शक्यता

अधिकार नसताना वाहतुकीकरिता पत्र दिल्याने "त्या" नगरसेवकावर कारवाईची शक्यता



मीरारोड 
हाताला काम नसल्याने  रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी आपल्या गावी परतीचा प्रवास सुरु केला आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने पायपीट करत ते गावी जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याचा फायदा काही वाहतुकदार घेत असल्याचे दिसत आहे. अशा मजुरांना पोलिसांची नजर चुकवून त्यांच्या गावी पोहोचवण्याचे काम हे वाहतुकदार करीत असल्याचे बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे येथील भाजपा नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी  त्यांना जाण्यासाठी परवानगी देणारे पत्र दिल्याचे पोलीसांना सापडले आहे. सदर बाब पालिका आयुक्तांना कळवण्यात आली आहे. अधिकार नसताना असे पत्र दिल्याने म्हात्रे यांच्यावर कारवाईची शक्यता असुन पोलीस चौकशी करत आहेत.
  भाइंदर व मीरारोड मध्ये अशा प्रकारे मजुरांना घेऊन वाहतूक करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. गेल्या दोन दिवसात पोलीसांनी अशी १० वाहने पकडुन ती जप्त करत गुन्हे दाखल केले आहेत. या वाहनां मधुन सुमारे २५० लोकांसह लहान मुलांने राज्यात तसेच परराज्यात नेले जात होते. सदर १० वाहने पोलीसांनी जप्त केली असुन गुन्हे दाखल केले आहेत.  काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावरील सगणाई देवी मंदिर नाका जवळ शनिवारी रात्री तब्बल ६ ट्रक व टॅम्पो वाहतुक पोलीस व काशिमीरा पोलीसांनी पकडले. यामध्ये उत्तर प्रदेश, सातारा आदी ठिकाणी जाणारी लोकं लपुन प्रवास करत होती. यात महिला व मुलांचा समावेश होता. नवघर पोलीसांनी भाइंदर पूर्वेला एक ट्रक उत्तर प्रदेश येथे जाण्याच्या तयारीत असताना तो पकडला. त्यात ३० लोकं व लहान मुलं होती. भाइंदर पश्चिमेला पोलीसांनी एक प्रवासी वाहन पकडले असता त्यात १६ लोकांसह लहान मुलं जालना येथे जाण्यास निघाले होते. सदर लोकं राई- मुर्धा भागातील होती.  शुक्रवारी रात्री मीरारोड पोलीसांनी बेव्ही पार्क नाका दरम्यान अंडी वाहतुक करणारा एक ट्रक पकडला असता ट्रेच्या मागे १९ महिला व १३ पुरुष असे ३२ जण दाटीवाटीने लपुन बसलेले होते. सदर लोकं कर्नाटकच्या बिदर येथे जाणार होते. तर भाइंदर पुर्वेच्या पांचाळ उद्योग भागात मालवाहु ट्रक मधुन सुमारे ३५ जणांना उत्तर प्रदेश येथे नेले जात असताना नवघर पोलीसांनी कारवाई केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com