Top Post Ad

व्हेंचर कॅटॅलिस्टची 'इन्शुरन्स समाधान'मध्ये गुंतवणूक

व्हेंचर कॅटॅलिस्टची 'इन्शुरन्स समाधान'मध्ये गुंतवणूक



मुंबई


भारतातील पहिला, सर्वात मोठा आणि अग्रगण्य एकत्रित इनक्यूबेटर आणि अॅक्सलरेटर मंच व्हेंचर कॅटॅलिस्टने तंत्रज्ञानपूरक विमा तक्रार निवारण मंच 'इन्शुरन्स समाधान'मध्ये गुंतवणूक केली आहे. सीड फंडिंग फेरीमध्येही ही गुंतवणूक करण्यात आली आहे. तंत्रज्ञान विषयक बाजू विकसित करण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येईल.


इन्शुरन्स समाधान हे मिस सेलिंग, फसवणूक किंवा क्लेम नाकारण्यात आलेल्या व्यक्तीला तसेच अरोग्य किंवा सामान्य विमा तक्रार करण्यासाठी मार्गदर्शन करते. त्यानंतर एआय किंवा एमएलद्वारे ठराविक निकष लावत तक्रारींची निवड करत त्या संबंधित विमा कंपन्या, नियामक, लोकपाल आणि न्यायालयाशी जोडली जातात.


व्हेंचर कॅटॅलिस्टचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष डॉ. अपूर्व राजन शर्मा म्हणाले, ‘सुमारे ११२ अब्ज डॉलरच्या इन्शुर्टेक बाजारात स्टार्टअप आणि गुंतवणूकादारांसाठी मोठी संधी आहे. पाश्चिमात्य कंपन्यांच्या बाजाराच्या तुलनेत परिस्थिती अजून नवजात अवस्थेत असली तरी तिच्या विस्तारीकरणाला मोठी संधी आहे. इन्शुरन्स समाधान खंडित झालेल्या बाजाराची बांधणी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मंडळावरील तज्ञ सदस्यांचे अनुभवाचा उत्तम वापर करून घेते. या निधीद्वारे कंपनीला टेक स्टॅक उभारण्यासाठी तसेच व्यवसायातील उद्दिष्ट समजण्यासाठी मदत होईल.’ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com