जवळपास ६००० भारतीय लोकांना कोरोनाची चाचणी
कोरोनाशी सध्या लढा देत असलेल्या इराण ने तिकडे असणाऱ्या जवळपास ६००० भारतीय लोकांना कोरोना ची चाचणी करण्यास असमर्थता दाखवल्या नंतर भारताने कोरोना व्हायरस ची चाचणी घेता येईल अशी पुर्णच्या पूर्ण प्रयोगशाळा वैज्ञानिक आणि डॉक्टरांसह इराण ला पाठवून दिली. तिकडे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याचं शिवधनुष्य पुन्हा एकदा भारतीय वायू सेनेच्या जांबाज सैनिकांनी आपल्या खांद्यावर उचलेलं आहे. जिकडे इतर अनेक देश आपल्याच नागरिकांना परत घेण्यास असमर्थता दर्शवत आहेत तिकडे नुसती त्यांची सुटका नाही तर त्यांची तपासणी करून त्यांना योग्य ती वैद्यकीय मदत देण्यासाठी झटणाऱ्या भारताच्या ह्या सगळ्या टीमला तमाम भारतीयांकडून कडक सॅल्यूट.
खालील फोटोत भारताची प्रयोगशाळा घेऊन भारतीयांना इराण मधून परत आणण्यासाठी उड्डाण भरणारे ग्लोबमास्टर विमान, भारतीय वायू दलाचे पराक्रमी सैनिक आणि त्यांच्या सोबत National Institute of Virology (NIV) पुणे इथले वैज्ञानिक आणि Indian Council of Medical Research (ICMR) चे डॉक्टर.
0 टिप्पण्या