Top Post Ad

कासारवडवली येथील संवेदनशील नैसर्गिक क्षेत्रामध्ये डेब्रिजचा भराव 

कासारवडवली येथील संवेदनशील नैसर्गिक क्षेत्रामध्ये डेब्रिजचा भराव 



 ठाणे
कासारवडवली येथील संवेदनशील नैसर्गिक क्षेत्रामध्ये होणारी डेब्रिजफेक येथील पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करत आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून घनकचरा अधिनियमांची अंमलबाजवणी करण्यात येत असून शहरात डेब्रिजफेक गुन्हा आहे, परंतु तरीही या डेब्रिजकडे दुर्लक्ष होत आहे.  कासारवडवली परिसरातील खाडीकिनाऱ्यापासून शहरापर्यंत विस्तीर्ण शेतजमीन आणि पाणथळभूमी पसरली आहे. अत्यंत दुर्मिळ पक्षी या ठिकाणी येत असून जैवविविधतेचा समृद्ध परिसर या भागात आहे, परंतु मुंबई-ठाण्यात निर्माण होणारा बराचसा बांधकाम कचरा या भागात आणून फेकला जात आहे. यामध्ये डेब्रिज, रस्ता तोडल्यानंतरचे साहित्य, डांबराचे तुकडे, सिमेंट, विटांच्या अवाढव्य अवशेषांचा यात समावेश असतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेकडो ट्रक दररोज या भागात दाखल होतात. हा परिसर सरकारकडून नोंदणीकृत केलेले कांदळवन किंवा पाणथळभूमी नसल्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात होते. 
महापालिका प्रशासन ही खासगी जमीन असल्याचे कारण सांगून काणाडोळा करत होती. या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांच्या कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीकडे ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन जिल्हा समितीच्या सदस्यांनी या भागात भेट देऊन पाहणी केली. १७ फेब्रुवारी रोजीच्या पाहणी दौऱ्यामध्ये या ठिकाणी डेब्रिजबरोबर जैवकचराही टाकला जात असल्याचे समोर आले. त्यामुळे या आदेशानंतरही भराव रोखण्याकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com