Top Post Ad

पर्यटन व्यवसायालाही कोरोनाचा फटका 

पर्यटन व्यवसायालाही कोरोनाचा फटका 



ठाणे
 कोरोनामुळे वसई तालुक्याच्या किनारीपट्टीच्या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.  वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. येथील हॉटेल, रिसॉर्ट मालकांना याचा चांगलाच आर्थिक फटका बसला असून संपूर्ण धंद्यावर मंदीचे सावट आले आहे. या ठिकाणी पूर्वी होळीच्या दिवसात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असत. पण यंदा  कोरोनामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याचे रिसॉर्ट मालकांचे म्हणणे आहे. तसेच वीकेण्ड किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी गजबजलेली हॉटेल्स, रिसॉर्ट कोरोना दहशतीमुळे ओस पडली आहेत. या ठिकाणी पर्यटक आणि ग्राहक येण्यास धजावत नसल्याने त्यांचा धंदा मंदावला आहे. 
पहिल्यांदाच वसईची पश्चिम किनारपट्टी पर्यटकांविना दिसते आहे. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात;  प्रामुख्याने विरार, वसई, येथील अर्नाळा, कळंब, राजोडी, सुरूची बाग, पाचूबंदर, किल्लाबंदर येथे पर्यटकांची गर्दी असते. पण कोरोनाच्या भीतीने समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकच नसल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकही चिंतेत दिसत आहेत. वसईच्या पश्चिम किनारपट्टीला मिनी गोवा असे संबोधले जाते. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर येथून रोज हजारो पर्यटक या ठिकाणी पिकनिकला येतात. चांगल्या पर्यटनामुळे इतकी वर्षे उत्तम व्यवसाय करणारे हॉटेल, रिसॉर्ट कोरोनामुळे मंदीच्या सावटाखाली गेले आहेत. किनारपट्टीवर पर्यटकांसाठी खास उंट सवारी करणारे उंटवालेसुद्धा पर्यटकांची वाट पाहत आहेत. दिवसाला हजार ते बाराशे रुपये कमावत असताना आता केवळ २०० ते ३०० रुपये कमाई होत असल्याने तेही चिंतेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com