... अन्यथा रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई - आरोग्य राज्यमंत्री
मुंबई
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोरी जात असून खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करीत आहेत. मात्र, काही डॉक्टर्स व खासगी रुग्णालये त्यांच्या ओपीडीमध्ये येणा-या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे. आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
खरेतर आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे. अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत, पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातील काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या क्षेत्रात काम करणा-या सर्वच डॉक्टर्स आणि रुग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणा-या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असे आवाहन यड्रावकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या