गँगरेप : पत्नीसह पतीलाही विवस्त्र करून मारहाण
अहमदनगर
बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. इतकेच करून आरोपी थांबले नाहीत तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवऱ्याचे वीर्य काढून बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांचाही समावेश असल्याचा आरोप पीडित पतीपत्नीने केला.
2016 मध्ये एका विवाहित महिलेवर अहमदनगरमध्ये सामुदायिक अत्याचार झाला होता. त्याची तक्रार दिल्यानंतर अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांसह 6 आरोपींचा समावेश आहे. याची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत आहे. मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही आरोपींना जामीन नाकारले आहेत. चार वर्षे उलटूनही गँग रेपसारख्या गंभीर गुन्ह्याचे चार्जशीट दाखल झालेले नाही. पीडित पती-पत्नीला ही फिर्याद मागे घेण्यासाठी यापूर्वीही महिलेला मारण्याचा प्रयत्न झाला होता.
24 जानेवारीला पीडित पती-पत्नी शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर आल्यावर एका रिक्षात बसले. रिक्षामध्ये एक माणूस आधीच बसलेला होता त्याने यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञात स्थळी नेले. त्याठिकाणी एका बंदिस्त रूममध्ये पती-पत्नीचे कपडे काढून विवस्त्र करून त्याच कपड्यांनी त्यांना टांगण्यात आले. पट्याने मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले. 'फिर्याद मागे घ्या, अन्यथा मारून टाकू,' अशी धमकी दिली गेली. मारायचा व्हिडिओ करून जर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला तर तुमची व्हिडीओ क्लिप आम्ही व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली. जर तुम्ही फिर्याद दिली तर तू याठिकाणी आला होता आणि तू दुसऱ्या महिला अत्याचार केला, अशी फिर्याद तुझ्यावर दाखल करेन, अशी धमकी देण्यात आली होती.
पती-पत्नीने आम्ही तुमच्या विरोधात केस दाखल करणार नाही असे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना नगरला आणून सोडले. मारहाण करताना आम्ही पोलीस आहोत असेही ही दोन आरोपी सांगत होते. 'कोर्टात जाऊ नको असे सांगितले होते. तरीही तू गेला म्हणून तुझेही हाल केले. आता गेला तर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी देण्यात आल्याचा पीडितांचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांचेही नाव आल्याने पीडित पती-पत्नीला न्याय मिळणार का, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असल्याचे वृत्त लोकमत न्यूज-१८ या वाहीनीने प्रसारीत केले आहे.
0 टिप्पण्या