जागतिक महिला दिना निमित्त डिझायर फाऊंडेशन तर्फे गरजू महिलांना साडी वाटप
ठाणे
जागतिक महिला दिना निमित्त डिझायर फाऊंडेशन तर्फे तीन हात नाका सिग्नल येथील गरीब गरजू महिलांना साडी वाटप कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात डिझायर फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव सौ प्रज्ञा ताई, सदस्य डॉक्टर गायत्री कुलकर्णी, सौ.विशाखा खताळ, सौ. स्नेहा खांडेकर, सौ. दिपमाला आणि नंदा बागूल यांची उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमात डाॅ. गायत्री कुलकर्णी यांनी महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले आणि कोरोना वायरस बद्दल माहिती दिली व त्यापासून बचाव कसा करावा याचे ही मार्गदर्शन केले.
प्रज्ञा ताई आणि दिपमाला मॅडम यांनी महिलांचा समस्या जाणून त्यांच्यासाठी स्वयंरोजगार सुरू करून देणार असे सांगितले. वरील उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डिझायर फाऊंडेशन चे कार्यकर्ते किरन जैस्वार मॅडम, कविता जैस्वार, मृणाल भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच महिलांना स्वतःचे अस्तित्व आणि स्वाभिमान कसा जपावा हे पटवून दिल्याबद्दल श्री.एस.चंद्रशेखर सर यांचे विशेष आभार...
0 टिप्पण्या