मुख्य शाखा वगळता इतर शाखा बंद ठेवण्यास परवानगी देण्याची बँक कर्मचाऱ्यांची मागणी
ठाणे
देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे. मात्र या अत्यावश्यक सेवेत कुठेही बँक कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. संचारबंदीमुळे बँकांकडे ग्राहक फिरकतही नाहीत. त्यामुळे बँकाच्या मुख्य शाखा वगळता इतर शाखा बंद करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक बँकांकडून करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बँका सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन झाल्यानंतर आता बँका तरी का सुरू ठेवायच्या, असा सवाल बँक कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. बँक बंद ठेवण्याची मागणी जरी आमची असली तरी एटीएममध्ये पैसे पुरविण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत.आठवड्यातील दोन दिवस त्या पद्धतीचे नियोजन करण्याची तयारीदेखील अनेक कर्मचा यांनी दाखविली आहे. आपल्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा देणा या सर्वांचेच कौतुक झाले. मात्र बँक कर्मचा यांचा साधा उल्लेख कोणत्याही नेत्याने अथवा मंत्र्यांने केलेला नाही. असे असले तरी आजही बँका सुरूआहेत. परंतु संचारबंदी लागू झाल्याने बँकेत ग्राहक येताना दिसत नाही. ग्राहकांची संख्या पूर्णत: रोडावली आहे. बँकेत काम करणारे अनेक कर्मचारी लांबून येतात. मात्र रेल्वे सेवा बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामावर येणे शक्य होत नाही. परंतु कामावर न गेल्यामुळे पगार तर कापला जाणार नाही ना, अशी शंकाही अनेक कर्मचा यांच्या मनात येत आहे. याची कुठेतरी विचार व्हावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
त्यातही आता अर्थमंत्र्यांनी पुढील तीन महिने बँकेचे हप्तेदेखील घेऊ नका, असे सांगितले आहे. त्यामुळे बँकेत ग्राहक येतील असे कुठेही दिसत नाही. दुसरीकडे संचारबंदी असल्याने पोलीस रस्त्यावर येणा या प्रत्येकाला मार देत आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये एका बँकेत परदेशातून आलेली एक व्यक्ती पासबुकची एन्ट्री करायला गेली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यामुळे बँकेतील इतर कर्मचा यांचीदेखील तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही बँक १० दिवस बंद ठेवण्यात आली होती. आधुनिक युगात बहुतांश व्यवहार हे आनलाइन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे अशा भीषण परिस्थितीत बँक सुरू असणे अपेक्षित नाही. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर आमच्या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी बँक कर्मचा यांनी केली आहे.
0 टिप्पण्या