Top Post Ad

कुपोषण मुक्तीसाठी झोळी मुक्ती मोहिम

कुपोषण मुक्तीसाठी झोळी मुक्ती मोहिम
ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे  सकारात्मक पाऊल



ठाणे : 
एखाद्या कुटुंबात लेकीचा जन्म व्हावा आणि मोठ्या आनंदात नातलगांच्या उपस्थितीत त्या तान्हुलीचं बारसं व्हावं असं चित्र मुरबाडच्या शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात आज पाहायला मिळाले. ठाणे जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाने आदिवासी कुटुंबात नुकत्याच जन्मलेल्या लेकींचा सामूहिक नामकरण सोहळा ( बारसं ) उत्साहात साजरा केला. नवजात बालकाची वाढ सुदृष्ट होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन या कुटुंबाना पाळणा, कांगारू किट, आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किट भेट देत कुपोषण मुक्तीसाठी झोळी मुक्ती मोहीम हाती घेत जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. 
 या सोहळ्यास ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दिपाली पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सपना भोईर, जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) संतोष भोसले, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती झुगरे,  पंचायत समिती सदस्य सीमा घरत, जया वाघ, पद्मा पवार, स्नेहा धनगर, विष्णू घुडे, प्रगती गायकर, सरपंच  हिराबाई हिलम, राजेंद्र भोईर, प्रकल्प अधिकारी कल्पना देशमुख, सतीश पोळ, श्रीमती राठोड तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
 ठाणे जिल्हयात विशेषतः शहापूर , मुरबाड या गटातील आदिवासी क्षेत्रात अनेकविध कारणांमुळे बाल संगोपन या महत्वपुर्ण बाबीकडे पुरेसे लक्ष पालंकाकडून दिले जात नाही . त्याचबरोबर बाल संगोपनाच्या काही पारंपारिक पध्दतीमुळे सुध्दा बालकांच्या सुरुवातीच्या कालावधीतच त्यांच्या विकासाला मर्यादा येतात . जन्मलेल्या बालकाच्या संगोपनात प्रामुख्याने झोळीचा केला जाणारा वापर आदिवासी क्षेत्रात एक सहजासहजी लक्षात न येणारी  समस्या आहे .
आदिवासी खेडयांमध्ये ब - याच कुटूंबात एक मीटर अंतरावर एक मीटर उंचीचे दोन खांब कायम स्वरूपी लावलेले असतात व घरात बालकाचा जन्म झाल्यानंतर काही दिवसात घरात ( विशषः साडी ) कापड वापरून झोळी तयार केली जाते व त्याचा वापर बालकांना झोपण्यासाठी केला जातो . ही  झोळी पाहिली असता त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या बालकामध्ये होत असल्याचे दिसून येते
झोळीची एकंदर रचना पाहिल्यास बालकांना श्वास घेण्यास त्रास होणे , पुरेसे खेळती हवा उपलब्ध न होणे, झोळीचे कापडास आर्द्र हवामानामुळे बुरशी संसर्ग होणे , बालकांच्या हालचालीस मर्यादा येणे, तसेच जास्त वेळ झोळीत ठेवल्याने एकंदर बालकांच्या वाढ व विकासाला मर्यादा येतात. तसेच झोळीतून काढल्यानंतर बरेचदा जमिनीवर बालकाला ठेवले जाते अशावेळी बालकाकडे लक्ष नसल्यास अज्ञात प्राण्यांच्या दंशाने सुध्दा बालकांच्या जिवितास धोका निर्माण होतो . या बाबींवरून लक्षात येते कि अप्रत्यक्षरित्या बाल संगोपनात झोळीचा वापर अशास्त्रीय पध्दतीने झाल्याने कुपोषण होण्याची शक्यता वाढते . त्यामुळे झोळी ऐवजी या कुटूबाना पाळणा,  कांगारू मदर केअर आणि इतर अनुषंगिक वस्तू देऊन बालकांचा वाढ व विकास सुयोग्य प्रकार होण्याबरोबरच श्वासवरोध , सर्पदंश / अज्ञात प्राणी दंश यामुळे होणा - या बालमृत्युंना सुध्दा आळा बसेल. या दृष्टीकोनातून ठाणे जिल्हयात आदिवासी क्षेत्रात झोळी मुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेच्या माध्यमातून मुरबाडच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमा दरम्यान मुरबाड तालुक्यातील विशेष प्राविण्य  मिळवलेल्या मुलींचा चॅम्पियन्स म्हणून गौरव करण्यात आला. त्याच बरोबर शासनाकडून प्राप्त झालेल्या बेबी केअर किटच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com