पत्रकार आणि रिक्षाचालकांना सॅनिटायझर - मास्कचे वाटप
ठाणे
हेरीटेज मोटार्सचे संचालक सुरेंद्र उपाध्याय आणि संतोष तिवारी यांच्यावतीने ठाणे शहरातील रिक्षा चालक आणि पत्रकारांना मोफत सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. ठाणे शहरामध्ये कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव जाणवला नसला तरी ठाणे शहरामध्ये एक कोरोनाबाधीत रुग्ण सापडला आहे. या पार्श्वभूमीवर हेरीटेज मोटार्सचे संचालक सुरेंद्र उपाध्याय, राष्ट्रवादीचे ठाणे शहर सरचिटणीस संतोष तिवारी आणि अमीत सरय्या यांनी कोरोनो संदर्भात जनजागृती अभियानही राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी ठाणे शहरातील पत्रकारांना एन 95 मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. ठाणे शहरातील रिक्षाचालकांनाही मास्क आणि सॅनिटायझर दिले. नितीन कंपनी, आनंद नगर, कोपरी, ठामपा मुख्यालय आदी ठिकाणच्या रिक्षा स्टँडवर जाऊन हे वाटप करण्यात आले. यावेळी मिलींद बनकर, सचिन रावराणे आदी उपस्थित होते.
रिक्षाचालकांचा दररोज शेकडो लोकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना कोरोनासारख्या विषाणूचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच, पत्रकार बांधव आपल्या जीवाची काळजी न करता सामान्यांना कोरोनांच्या संदर्भात माहिती पुरवण्याचे काम करीत असतात. त्यांचाही शेकडो लोकांशी संपर्क येत असतो. त्यामुळेच पत्रकारांनाही सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले आहे. ही मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवणार असल्याचे सुरेंद्र उपाध्याय यांनी सांगितले.
0 टिप्पण्या