कोरोनाचे सावट : तरीही ठाण्यात मिसळ महोत्सव
ठाणे:
मुख्यमंत्र्यांसोबतच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. तरीही ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगर परिसरातील शिवसैनिक दिशा ग्रुपचे भास्कर बैरीशेट्टी आणि त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका असणाऱ्या पत्नी रागिणी बैरीशेट्टी यांच्या आशीर्वादाने पोखरण रोड येथील उन्नती गार्डन मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महोदयांचे आदेश डावलून तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे शहरभर होर्डिंग लावत दिमाखदार उद्घाटनही झाले
कोरोना'चे थैमानाचे सुरू असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी व्यायामशाळा, मॉल, जलतरण तलाव, चित्रपटगृहांवर सरसकट बंदी लागू केली. सरकार आणि प्रशासनाने जास्त गर्दी होऊ यासाठी ही पावले उचलली आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनाही त्यांनी १५ दिवस नागरिक, मतदार किंवा लोकांचा जमाव एकत्र येऊन जमा होतील, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असा आदेश दिले आहेत.
मात्र परिसरात नेहमी सामाजिक कार्य करणाऱ्या दिशा ग्रुपच्या बैरीशेट्टी दाम्पत्याकडून तरी' कोरोना'चे सावट असताना नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची अपेक्षा नव्हती. एकीकडे हिंदू नववर्षाच्या स्वागताचा मानबिंदू असणाऱ्या जिल्ह्यातील गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असताना व सातारा जिल्ह्यातील बावधनच्या पारंपारिक बगाड यात्रेच्या आयोजनानिमित्त संबंधितांवर कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुद्द जिल्हाधिकारी कारवाईच्या तयारीत असताना ठाण्यातील अशा मिसळ महोत्सवावर जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करणार अशी प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप दिनकर पाचंगे केली केला आहे.
0 टिप्पण्या