ठेकेदाराच्या करारनाम्याची फाईलच गहाळ: ठाणे महापालिकेचा अजब कारभार
ठाणे :
ठाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध रुग्णालयात अत्यावश्यक सेवा असलेल्या रुग्णवाहिकेवर कंत्राटी वाहन चालकांची आणि ठेकेदाराची अवस्था इकडे आड , तिकडे विहीर अशी झाली आहे. ठेकेदारांचा ठेका संपून दोन महिने उलटले. वाढीव मुदत मिळालीच नाही. त्यामुळे चालकांचा पगार ठेकेदार करणार कसा ? यामुळे रुग्णवाहिकेवरील चालक हवालदिल झाले आहेत. वाढीव मदतीला विलंब लागला यामागचे कारण पालिका अधिकाऱ्यांकडून कराराची फाईल गायब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे ठाणे महानगर पालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पालिकेचे कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारांचा ठेका १५ डिसेंबर, २०१९ रोजीच संपुष्टात आला. मात्र या ठेकेदाराच्या करारनाम्याची फाईलच गहाळ झाल्याने कंत्राटाला वाढीव मुदत मिळालीच नाही. मात्र चालकांची सेवा सुरूच आहे. पालिका आरोग्य विभागाच्या प्रमुखाद्वारे मात्र वाढीव मुदत घेऊ असे सांगत असले तरीही पालिका अधिकाऱ्यांनीच फाईल गहाळ झाल्याने वाढीव मुदत लोंबकळत पडली आहे. दरम्यान पालिकेला चालक कंत्राटी पद्धतीने पुरविणाऱ्या ठेकेदार चालकांना पगार देणार कुठून? हा प्रश्न ठेकेदाराला सत्व आहे. तर ठेकेदारांचा ठेकाच संपला आणि फाईल गायब झाल्याने आणि वाढीव मुदत न मिळाल्याने ठेकेदार पगार देणार कुठून ? या प्रश्न चिन्हात कंत्राटी चालक लटकले आहेत. ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार अद्याप पालिका अर्थसंकल्प सादर झालेला नाही. वाहन चालकांची संख्या कमी आहे. तर वाढीव मुदतीसाठी किमान तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. प्रशासकीय मंजुरी , स्थायी समिती मंजुरी आणि नंतर महासभा मंजुरी मिळाल्यानंतर वाढीव मुदत मिळेल. तो पर्यंत चालकांना पगार देणार कुठून असा सवालही उपस्थित केला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अत्यावश्यक सेवेच्या रुग्णवाहिकेवर कंत्राटी पद्धतीने मागील आठ वर्षांपासून काम करीत आहे. आज नाहीतर उद्या पालिका सेवेत सामावून घेतील अशी आशा या चालकांना आहे. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध परिसरातील मुंब्रा, कळवा, मीनाताई ठाकरे व इतर आरोग्य केंद्र आणि पालिका मुख्यालयात चार असे जवळपास २६ च्या आसपास चालक काम करताहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कंत्राटी चालकांच्या वाढीव मुदत हि प्रक्रियेत आहे. अन मिळणारच आहे. दरम्यान ठेकेदाराच्या कराराची फाईलच सापडत नसल्याचा इन्कार करीत लवकरच अत्यावश्यक सेवेच्या चालकांच्या ठेक्याला वाढीव मुदत मिळेल.
0 टिप्पण्या