Top Post Ad

महिला वैमानिक कॅप्टन स्वाती रावल याचं सर्वच स्तरातून कौतूक 

२६३ भारतीय विद्यार्थ्यांच्या विमानाचं सारथ्य स्विकारणाऱ्या
महिला वैमानिक कॅप्टन स्वाती रावल याचं सर्वच स्तरातून कौतूक 



मुंबई
चीनमधील वुहान येथून पसरत गेलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता १०० हून अधिक देशांमध्ये पोहचला आहे. युरोपीयन देशांबरोबरच आशियामधील अनेक देश याचा फैलाव रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. इटलीमध्ये कोरोनाने अगदी थैमान घातलं आहे. इटलीमध्ये यामुळे पाच हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इटलीमध्ये अडकलेल्या २६३ भारतीय विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आलं. करोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या देशामधून भारतीयांची सुखरुप सुटका करण्याचे मोलाचे कार्य महिला वैमानिक कॅप्टन स्वाती रावल यांनी केलं. त्यामुळे त्याचं सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. 
 रावल या दिल्लीमधून एअर इंडियाचे बोईंग ७७७ विमान घेऊन इटलीमध्ये गेल्या आणि तेथून २६३ भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप परत घेऊन आल्या. ही मोलाची कामगिरी करणाऱ्या स्वाती यांना एक लहान मुलगाही आहे. २०१० साली जेव्हा पहिल्यांना एअर इंडियाने सर्व महिलांचा समावेश असणारे एअर इंडियाचे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला पाठवले होते तेव्हा स्वाती चर्चेत आल्या होत्या. त्या या महिला क्रूच्या सदस्या होत्या. स्वाती यांना विमान उड्डान करण्याचा १५ वर्षांचा अनुभव आहे.  स्वाती यांना लढाऊ विमान चालवण्याची इच्छा होती. आपण फायटर जेट चालवावे असे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होतं. मात्र त्यावेळी भारतामध्ये महिला वैमानिकांना लढाऊ विमानं चालवण्याची परवाणगी नव्हती. त्यामुळेच त्यांनी कमर्शियल पायलेट होण्याचा निर्णय घेतला.स्वाती यांनी इटलीमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणल्याचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी त्यांचे कौतुक केलं.
इटलीतून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर एअर इंडियाच्या विशेष विमानाने लॅण्डींग केलं. या विमानातील सर्व विद्यार्थ्यांच्या शरिराचे तापमान तपासून त्यांची आरोग्य चाचणी करुन आयटीबीपीच्या छावला येथील छावणीमध्ये विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com