विजय सिंघल आजपासून ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू

Top Post Ad

विजय सिंघल आजपासून ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू



ठाणे


1997 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी आयआयटी रुड़की येथून बी.ई. (सिव्हिल)मध्ये सुवर्णपदक पटकावलेले तसेच आयआयटी दिल्ली येथून बिल्डिंग सायन्स अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये एमटेकचे शिक्षण पूर्ण करणारे, लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून लोक सेवा धोरण व व्यवस्थापन या विषयात एम.एससीचे शिक्षण पूर्ण झालेले विजय सिंघल हे आजपासून ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी रुजू झाले आहेत. त्यांनी महापालिका भवन येथे त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.


      सिंघल यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी, मलकापूर, बुलढाणा,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद, हिंगोली जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त, साखर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, उद्योग आयुक्त आणि बृहन्मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे.      जळगाव जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी राबविलेल्या नदी जोडणी प्रकल्पासाठी तत्कालीन  पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे हस्ते त्यांना “सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशासनासाठी पंतप्रधान पुरस्कार"देण्यात आला आहे.    राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिकरित्या सादर केलेल्या या प्रकल्पाचे माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी देखील कौतुक केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "भारतातील सर्वात स्वच्छ राज्याची राजधानी" या विभागात मुंबई शहराला  स्वच्छ, सुंदर बनविल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.   साखर आयुक्त कार्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल सुवर्णपदक तसेच विविध डिजिटल उपक्रम राबवून संपूर्ण यंत्रणा ऑनलाईन सुरू केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना रौप्यपदक देवून गौरवण्यात आले आहे.      ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय नदी परिषदेत जळगाव जिल्ह्यातील नदी-जोडणी ” प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.       मुंबई महापालिकेमध्ये राबविलेल्या विविध डिजिटल उपक्रमांसाठी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते त्यांना "राष्ट्रीय डिजिटल ई-शासन पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. यासह सामाजिक व प्रशासकीय कार्यात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.


 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या