पालघर येथील आग प्रकरणी खुलासा
“गॅलेक्सी सर्फेक्टंट्स लि.मध्ये (“गॅलेक्सी”) गेली चार दशके सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
गॅलेक्सीने लॉकडाउन दरम्यान काम करण्यासाठी आवश्यक त्या मंजुरी घेतल्या होत्या आणि आमचे प्रकल्प चालवण्यासाठी आम्ही केंद्र व राज्य सरकार यांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत. तारापूर M-3 प्रकल्पामध्ये आज झालेल्या लहान इंटरमीडिएट फीड टँक स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला व तीन जण जखमी झाले. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेने प्रकल्पामध्ये आग लागली नाही. M-3 ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते आम्ही करत आहोत आणि या घटनेतील बळींच्या कुटुंबीयांना संपूर्ण मदत देणार असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली आहे
जे सांगितले जात आहे त्यापेक्षा वस्तूस्थिती वेगळी असून, प्रकल्पामध्ये त्या वेळी 67 हून अधिक कर्मचारी नव्हते. गॅलेक्सीने लॉकडाउन दरम्यान काम करण्यासाठी आवश्यक त्या मंजुरी घेतल्या होत्या आणि आमचे प्रकल्प चालवण्यासाठी आम्ही केंद्र व राज्य सरकार यांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत. कृपया, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका.गॅलेक्सीमध्ये इतक्या मोठ्या स्वरूपाचा प्रसंग पहिल्यांदाच घडला असून आणि तो अत्यंत दुर्दैवी असून, गॅलेक्सी सुरक्षेचे पालन करत आहे व त्यासाठी बांधील आहे. आम्ही पालन करत असलेले सुरक्षेचे मापदंड या श्रेणीतील सर्वोत्तम मापदंडांच्या तोडीचे आहेत. असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत, अशी दक्षता आम्ही घेऊ.असे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या