Top Post Ad

महापालिकेच्या विना वेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काँग्रेसची मदत

महापालिकेच्या विना वेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काँग्रेसची मदत



ठाणे


कोरोना संसर्गाचे ठाण्यातही काही रूग्ण मिळत असताना हा संसर्ग संपूर्ण ठाण्यात फैलावू नये म्हणून ठाणे महानगरपालिकेने ठीक ठीकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली अनेक राजकीय पुढारी ही फवारणी करण्यासाठी पुढे पुढे करताना दिसत होती परंतु ही फवारणी करणारे जे कर्मचारी आहेत ते विना ग्लोवस व मास्क हे काम करत आहेत व त्यांना मागील 2 महिन्यापासून वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.याबाबत अभिनव आंदोलन करणा-या कर्मचाऱ्यांना  काॅग्रेसच्या ओ.बी.सी.विभागाने मदतीचा हाथ पुढे करून एक वेगळाच संदेश दिला.


शहर काँग्रेस ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी त्यांना मास्क,हँड ग्लोवससह काही दिवसाचे अन्नधान्यांचा साठा उपलब्ध करून दिला.याप्रसंगी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की कालच सर्व  वाहिन्यांवर निर्जंतुकीकरण करणारे कर्मचारी आहेत त्यांना 2 महिन्यापासून वेतनच मिळत नसल्याचे वृत्त समजले वास्तविक पाहता ही सर्व कर्मचारी आपण सर्व घरात बसलो असताना वीनावेतन प्रत्येक प्रभागात फीरून निर्जंतुकीकर्णाची फवारणी करण्याकरिता आपला जीव धोक्यात घालून काम करीत असताना ठाणे महानगरपालिकेने यांना वेतनच देऊ नये ही अत्यंत धक्कादायक बाब असून काँग्रेसच्या माध्यमातून मा प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने व प्रदेश ओबीसी विभाग अध्यक्ष प्रमोद मोरे व काँग्रेस चे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाणे काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिली. याप्रसंगी ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे हे हि उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com