एक लाख २८ हजारांच्या सिगारेट पाकिटसह एकास अटक
ठाणे :
ठाण्यातील कासारवडवली भागातील किंगकाँगनगर येथील गुप्ता चाळीमध्ये एक व्यक्ती बेकायदेशीरपणे सिगारेटच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना त्यांच्या खबऱ्याने दिली होती. याच माहितीच्या आधारे ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डोंगरी पाडा येथे सापळा रचून सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, पोलीस हवालदार एस.बी.खरात, आर. एस. चौधरी आणि चंद्रकांत गायकवाड आदींच्या पथकाने गुप्ता याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध कंपन्यांची १५०० पेक्षा जास्त सिगारेटची पाकिटे ७३ बॉक्समधून जप्त केली. त्याच्याविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ सह सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा २००३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे सिगारेटसची विक्री करणा-या सुनिलकुमार गुप्ता (३०, रा. डोंगरीपाडा, ठाणे ) याला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख २८ हजारांची सिगारेटची पाकिटेही जप्त केली आहेत.
0 टिप्पण्या