वासिंदमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचा-यांची मोफत आरोग्य तपासणी
शहापूर
कोरोना महामारीचे थैमान सुरू असताना आपला जीव मुठीत धरून दररोज नागरिकांच्या भवितव्याची काळजी वहाणारे पोलीस, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, या अत्यावश्यक सेवा कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वासिंदमधील डॉ. कल्पेश तारमळे यांनी अभिनव उपक्रम राबविला आहे. तीन दिवस मोफत अशा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या निरामया लाईफ हॉस्पिटल आणि द्रोण डायग्नोस्टिक, पॅथॉलॉजीमध्ये वासिंद परिसरातील ९० ते १०० शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणी सोबत रक्त तपासणी, सीबीसी, शुगर, चेस्ट एक्स रे, इसीजी तपासणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वासुदेव काठोळे, विनोद म्हसकर, काळूराम पवार, सामाजिक कार्यकर्ते शैलेश आंबवणे, अभिषेक काठोळे, योगेश जोशी, विवेक साळुंखे, पत्रकार महेश तारमळे आदी उपस्थित होते. लाॅकडाऊन काळात सोशल डिस्टेन्सचे पालन करून पूर्ण वेळ मोफत ओपीडी सुरु ठेवून या कर्मचा-यांसह सर्वांना आरोग्य सेवा देणार असल्याचे डॉ. मोनिका तारमळे, व डॉ. कल्पेश तारमळे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या