Top Post Ad

ठामपा आयुक्तांची घेतला आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा आढावा

ठामपा आयुक्तांची घेतला आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा आढावा




ठाणे


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, सदर नियंत्रण कक्षात आरोग्य विभागामार्फत २४ x ७ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट देवून कोरोना कोवीड १९ पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणा-या कामकाजाचा आढावा घेतला.


सिंघल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे काम कशा प्रकारे चालते याची माहिती घेतली तसेच कोणत्या प्रकारचे कॅाल्स येतात, कोरोना विषयाचे किती कॅाल्स येतात याचा आढावा घेवून तेथे नियुक्त असलेल्या वैद्यकीय अधिका-यांशी चर्चा केली त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये असलेल्या सुविधांचा अभ्यास करून या ठिकाणी काय करता येईल याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com