अकलेचे दिवे लावणे याला म्हणतात - सचिन सावंत
मुंबई
कोरोनाने देशाला ग्रासले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी घरातील विजेवर चालणारे प्रकाश दिवे (बल्ब) बंद करून दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर विरोधकांनी टीकाही केली. देशात आरोग्य सुविधांवर लक्ष देण्याची गरज असताना पंतप्रधानांनी असं आवाहन करणं चुकीचं आहे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. त्यामुळे संबंध देशात संभ्रमाचे वातावरण पसरले होते. अनेकांना याकडे दुर्लक्ष केले. मात्र हा कार्यक्रम यशस्वी झाला असे भासवण्यासाठी सध्या भाजपमध्ये चढाओढ लागली आहे. त्यातच भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक अवकाशातून टिपलेला एक फोटो ट्विट करून विरोधकांवर टीका केली. पण, यावरूनच ते नेटकऱ्यांच्या रडारवर आले. हा फेक फोटो असल्याचं निर्दशनास आणून देत नेटकऱ्यांनी भातखळकरांना ट्रोल केलं.
भातखळकर यांनी व्हाट्सअपवर व्हायरल झालेला एक फोटो ट्विट केला. त्याचबरोबर हसणाऱ्यांचे दात घशात घालत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद दिला. करोनाच्या अंधकारात आशेचा दिवा प्रज्वलित केला. करोना संकटाच्या विरोधात देश एकजूट होऊन उभा राहिला. हे पहा अवकाशातून उपग्रहानं टिपलेलं छायाचित्र,”असं सांगत भातखळकर यांनी विरोधकांना सुनावलं. आणि स्वत:च्ं हसं करून घेतलं आहे.
हा फोटो फेक असल्याचंही नासानं म्हटलं आहे. तोच फोटो भातखळकर यांनी ट्विट केला. या फोटोवरून नेटकऱ्यांनी भातखळकर यांना चांगलंच ट्रोल केलं. “सर, आमदार आहात आपण. ते पण गौरवास्पद परंपरा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे. जरा संवेदनशीलपणे वागा की साहेब,” असं आशिष मेटे यांनी भातखळकर यांना ट्विट करून सुनावलं आहे.
“हा हा हा! जंगलात, दऱ्या खोऱ्यात, पर्वत रांगांमध्ये पण दिवे लागले बरं! प्राण्यांना पण दिवे पोहोचविले होते का? अकलेचे दिवे लावणे याला म्हणतात. देशाला मुर्ख बनविण्याचा उद्योग या भाजपाचे लोक करत आहेत. जागे व्हा!,” अशी कोपरखळी लगावत काँग्रेसचे सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली.
0 टिप्पण्या