Top Post Ad

थोर अर्थशास्त्रज्ञ  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

थोर अर्थशास्त्रज्ञ  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 


तिशीच्या आतल्या एका तरुण विद्यार्थ्याने त्या काळच्या केन्ससारख्या दिग्गज अर्थतज्ज्ञांनी मांडलेल्या मतांना विरोध दर्शवून पुराव्यानिशी स्वतःचे मत सिध्द करावे, ही बाब अर्थशास्त्रातील त्यावेळची एक #अद्भुत_बाब होती असे मला वाटते. तसेच या ग्रंथातून ठायी ठायी #देशप्रेमी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन होते. भारतातल्या दीन दुबळ्यांचे अश्रू पुसण्याची त्यांची कळकळ त्यांच्या ह्या ग्रंथराजातून प्रतित होते.
      अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत भीमराव आंबेडकर इंग्लंडमध्ये राहत होते. तुटपुंज्या स्कॉलरशिपवर त्यांचे शिक्षण चालले होते. ती स्कॉलरशिप बंद पडली असती तर उपासमारीला सामोरे जावे लागले असते. अशा विपरीत आर्थिक विवंचनेत असतानाही त्यांनी ह्या ग्रंथात #इंग्रजीराजवटीवर #टीकेचेकडक_आसूड ओढलेत. त्यांनी दाखवून दिले की, इंग्रजांनी चलन माध्यमाचा वापर करुन भारतातील अगणित संपत्ती ब्रिटनमध्ये नेली. वेळप्रसंगी सत्ताधाऱ्यांना मूर्ख राजकारणी म्हणून त्यांनी त्यांची निंदाही केली. तुम्ही भारतावर राज्य करायला नालायक आहात अशा शब्दांत त्यांची संभावना केली. अशी व्यक्ती अतुलनीय देशप्रेमी म्हणूनच गणली गेली पाहिजे.
      भीमराव आंबेडकरांनी मांडलेले मुद्दे, विचार भारतीय जनतेच्या भल्याचा विचार करुन मांडले होते. बांधिलकी भारताशी, भारतीयांशी होती. इंग्रजांशी नव्हती. ब्रिटिशांना न मानवणारी न पटणारी मते मांडल्यामुळे व ब्रिटिश सरकाराच्या भारताविरोधी धोरणावर #घणाघाती_टीका केल्यामुळे ह्या प्रबंधासाठी भीमराव आंबेडकरांना डि.एससी ही सर्वोच्च पदवी देण्यात टाळाटाळ सुरु झाली. भीमराव आंबेडकरांना मध्यस्थामार्फत सुचविण्यात आले की, आपण आपले काही मुद्दे व मते बदलून ब्रिटिश सरकारवरील टीका सौम्य कराल तर आपल्या प्रबंधाचा विचार केला जाईल. भीमरावांनी त्यांना स्पष्टपणे कळवले की, "मी जे मुद्दे मांडले आहेत ते पूर्ण अभ्यास करुन भारतीय जनतेच्या भल्याचा विचार करून मांडले आहेत. त्यामुळे त्यात बदल करण्याचा प्रश्नच नाही. शेवटी तडजोड म्हणून भीमरावांनी आपल्या तीक्ष्ण भाषेत थोडी मृदुता आणली. तरी ब्रिटिशांना नाॅनसेन्स, फुलीश असे शेलके आहेर आपल्या ग्रंथात ठेवलेच. म्हणजे मूळची भाषा किती जहाल असेल ह्याची कल्पना करा. ह्यातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा ज्वलंत राष्ट्रवाद दिसतो. त्यांना ब्रिटिशांचे एजंट म्हणणाऱ्यांच्या बुध्दीची किव करावी तेवढी थोडीच आहे.
      प्रा.डाॅ.कॅनन यांना त्यांच्या दृष्टीकोनातून  डॉ. आंबेडकरांचे काही मुद्दे चुकीचे वाटले पण  डॉ. आंबेडकरांनी अगदी मूळ मुद्दयाला हात घालून #वर्मावरच_बोट ठेवले आहे. हेही त्यांना जाणवले. पुढच्याच परिच्छेदात ते म्हणतात, "In his practical conclusion, I am inclined to think he is right."
      सदरच्या ग्रंथात, द्विधातू माध्यमातून चांदी माध्यमाकडे या प्रकरणात  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या मोगल सम्राटांच्या काळापासूनचा चलन पध्दतीचा इतिहास #अत्यंत_माहितीपूर्ण आणि #रोचक पध्दतीने दिला आहे.       सुवर्ण प्रमाणाकडून सुवर्ण विनिमय प्रमाणाकडे या प्रकरणात  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले की, भारतात सुवर्ण प्रमाण प्रस्थापित होता होता सुवर्ण प्रमाण पध्दतीचे रूपांतर हळूहळू सुवर्ण विनिमय पध्दतीत झाले. ह्या दुर्देवी घटनेला #ब्रिटिश_सरकारचा #नाकर्तेपणा कारणीभूत आहे. या प्रक्रियेत लोकं नागवली गेली.      Problem of Rupees:- It's Origin and It's Solution हा ग्रंथराज खूप #समृध्द आणि #परिपूर्ण आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासलेल्या संदर्भ ग्रंथाचा एक छोटासा डोंगरच तयार होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com