उमेद फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम, भाजीपाला आणि फळे माफक दरात उपलब्ध करून दिली
ठाणे
आज वैश्विक महामारी कोरोनाचे जे संकट आपल्या देशावर महाराष्ट्रावर ओढवले आहे त्यात लॉक डाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूसाठी लोकांची गैरसोय होतेय याच साठी ठाण्यातील उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष *निलेश मधुकर कोळी* यांनी सामाजिक अंतर (social distancing) चे पालन करत आज महागिरी कोळीवाडा आणि खारकर आळी परिसरातील लोकांसाठी भाजीपाला आणि फळे माफक दरात उपलब्ध करून दिली. विभागातील नागरिकांनी या उपक्रमास उदंड असा प्रतिसाद दिला. नागरिकांनी आमदार संजय केळकर आणि निलेश कोळी टीमचे आभार मानले व या उपक्रमाचे कौतुक केले
0 टिप्पण्या