Top Post Ad

चळवळीचे बालेकिल्ले पुन्हा मिळवण्याचा एल्गार करुया..

चळवळीचे बालेकिल्ले पुन्हा मिळवण्याचा एल्गार करुया..



सचिन आठवले जे रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मुंबईचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी एक राजकीय पोस्ट फेसबुक वर टाकली. सदर पोस्ट मी आपल्या माहितीसाठी खाली नमुद केली आहे 'आदित्य ठाकरे वरळी चे आमदार पर्यटन,पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री यांनी एकदा तरी वरळी मतदार संघात येऊन मतदाराना दर्शन द्यावे.' सदर पोस्टवरून उलट सुलट प्रतिक्रिया आल्या व त्यातील काही लोकांनी पोस्ट वर टीका केली व काही टिका रिपब्लिकन नेते नामदार रामदास आठवलेयांच्या पर्यंत गेल्या, कारण सचिन आठवले हे आठवले यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच काही पोस्ट रिपब्लिकन चळवळीला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा होत्या. खरं तर मला असे वाटते, वरळी हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला होता, या मतदार संघातून रिपब्लिकन नेते बी सी कांबळे साहेब निवडुन गेले होते, तसेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. रिपब्लिकन पक्षाने अनेक महाराष्ट्र राज्याचे प्रश्न सभागृहात व सभागृहाच्या बाहेर संघर्षातून सोडवले आहेत. तरी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते म्हणून हा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्याची रणनिती आखली पाहिजे व मतदार संघात न फिरणारे लोकप्रतिनिधींना कायमचे घरी बसविले पाहिजे.तसेच शिवसैनिकांना आठवण करुन द्या की युती असताना आदित्य ठाकरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाने त्यांना मतदान केले आहे. सदर विषयाच्या अनुषंगाने डॉ प्रा विजय मोरे हे म्हणतात की, 'ते येत नाहीत असा ओरडा करण्यापेक्षा आपण मतदारांची काळजी घ्या. पुढील निवडणुकित उपयोग होईल. व प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा क्रियाशिल व्हा तर आपल्या पक्षाला उपयोग होईल'. तसेच चंद्रकांत जगताप म्हणतात की, 'आदित्य ठाकरे ला आमदार करायचं काम झालय आता त्याना काय पडलेले नाही, व वरळी सारख्या ठिकाणी ९०३ बहुजन समाज असताना अनेक लोक वेगवेगळ्या गटात विखुरलेले आहेत.त्यात ही स्वत: ला नेते म्हणवणारे प्रस्थापितांच्या घरी रांगेत उभे आहेत अश्याना मागे सारून नवीन नेतृत्वाने पुढे यायला हवे...समाजभिमुख काम करावे....' तर प्रविण घाडगे म्हणतात की, 'साहेब येतील पुढच्या वेळी निवडणूक आली की येतील' सदर तीनही सहकायांनी मांडलेली मतं ही फार मुलभुत असुन आपल्याला हे निश्चितपणे ठरवावे लागेल की प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा प्रतिक्रिया तर कामगारांना दिल्याच पाहिजेत मात्र त्याच्याबरोबर मूलभूत कामही करणे आवश्यक आहे व दुरावलेला मतदार रिपब्लिकन पक्षाकडे आणि आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित करणे हे गरजेचे आहे. वरळी सारख्या मागासवर्गीय बहुल भागातील लोक आंबेडकरी चळवळीत आहेत, मात्र ती रिपब्लिकन पक्षाचे मतदार होताना दिसत नाहीत. रिपब्लिकन पक्षाला आणि आंबेडकरी चळवळीतील महत्वाच्या नेत्यांना महानगरपालिकेच्या किंवा विधानसभेच्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये हे स्पष्ट होत आहे की मतदार दुरावला आहे. कदाचित नगरसेवक म्हणून निवडुन आलेला राष्ट्रवादी चळवळीचे राजकीय बालेकिल्ले आपण ताब्यात व्यक्ती अनुसूचित जातीतील व सातारा सांगली भागातील असेल पण प्रस्थापित किंबहुना विरोधी विचारसरणीच्या पक्षातील असतो. यातून आपल्याला बोध घ्यायचा असेल तर आपल्याला काम हे करावेच लागेल परंतु पारंपरिक पद्धतीने काम न करता थोडसं नव्यानं नाविन्यपूर्ण गोष्टी करुन व खासकरून तरुणांनी राजकिय कामात सक्रिय होणं आवश्यक आहे. तरच रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आम्ही खया अर्थाने व आपला तो हक्काचा मतदारसंघ मिळवू शकतो. तसेच पुन्हा पुर्वीचे वरळीतील आंबेडकरी रिपब्लिकन पक्षाचे वैभव निर्माण करु शकतो. पण त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आजकाल जे प्रस्थापित पक्ष निवडणूक जिंकण्याचे कौशल्य निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या दरम्यान अवलंबतात, जे काहीना आमिष दाखवून व भुलथापा मारुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्नही केला जातो, हे आपण समजून घेतले पाहिजे. पर्यायानं साडेचार वर्ष चळवळीचे आणि रिपब्लिकन पक्षाचे काम करणारी बरीच मंडळी निवडणुकीच्या त्या कालखंडात निष्प्रभ ठरतात. सदर अनुषंगानं सचिन आठवले यांनी लिहिलेली गोष्ट वरवर जरी आपल्याला प्रतिक्रियावादी वाटत असेल तरी सदर पोस्ट वर झालेली चर्चा ही रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले हत्याकांड टिकवूण व याबाबतची आव्हानाना समजून घेऊन त्याचा आपण विचार करणं गरजेचे आहे.


आपण योग्य रणनीती आखली तर निश्चितपणे आजही आपल्याला रिपब्लिकन पक्षाला व आंबेडकरी विचाराच्या व्यक्तीला हा वरळी मतदार संघ हा आपला बालेकिल्ला टिकून ठेवता येईल. मागील दहा पंधरा वर्षांमध्ये झालेली पडझड आपल्याला निश्चित पणाला सुधारता येईल. मागील विधानसभेमध्ये डॉ सुरेश माने हे निवडणुकीला उभे होते, डॉ सुरेश माने यांची अभ्यासक व कायदेतज्ञ म्हणून एक प्रतिमा असुन सुद्धा त्यांना अपेक्षित तेवढी मते पडलेली नाहीत. त्यातच गटातटाचा विषय आपल्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिला जातो व काही अंशी ते खरंही आहे. त्या गटा-तटाच्या मुळे मतदारांमध्ये एकजीन्सीपणा व एका समुदायाची राजकिय ताकद दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणामध्ये सुद्धा आपले वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या आघाडीमध्ये असल्यामुळे आपल्याला खया अर्थानं या व अशा पूर्वीचे बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघाच्या वरती कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. मला असं वाटतं, अजुनही वेळ गेलेली नाही कारण २०२४ ची विधानसभा निवडणूक येई पर्यंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही एक चांगली संधी आहे. सदर संधीचा उपयोग करून आपला जो हक्काचा बालेकिल्ला दुस्रयाच्या ताब्यात गेलेला आहे तो पुन्हा एकदा मिळवण्यासाठी भान ठेवून नियोजन करून निवडणुकीच्या काळात बेभान होऊन दिग्विजयी नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा रिपब्लिकन पक्ष, निळा झेंडा आणि आंबेडकरी चळवळीतील वरळी सारखे बालेकिल्ले हे समीकरण लोकांच्या समोर घेऊन जाऊन यश संपादन करण्यासाठी परिश्रम करावे लागेल. एखदा परिश्रम करण्याचे ठरवून आपण कामाला लागला तर समाजात विश्वास निर्माण होईल व रिपब्लिकन पक्ष, निळा झेंडा आणि आंबेडकरी चळवळीवर प्रेम असणारे लोक मदत करायला पुढे येतील. आता मात्र आवश्यकता आहे की, ह्या कालखंडात जर आपण आपले बालेकिल्ले जर विरोधकांच्या आणि विरुद्ध विचारसरणीच्या ताब्यामध्ये गेले तर आपल्याला भविष्य काळामध्ये आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत राजकीय प्रक्रीया मधून आपले व इतर दुर्बल घटकांचे मुलभुत प्रश्न प्रामुख्याने आरक्षण, शिक्षण, नोकरी, आर्थिक तरतुदी, संविधानिक संरक्षण इत्यादी सोडवण्यासाठी अडचणी निर्माण होतील.


सदर धोका लक्षात घेऊन आपण अंतर्मुख होऊन रिपब्लिकन पक्षाचे आणि पर्यायाने आंबेडकरी चळवळीचे राजकीय बालेकिल्ले आपण ताब्यात घेतले पाहिजेत आणि ते घेण्यासाठी आपण दिग्विजय नेत्यांच्या विचारांचा व राजकिय प्रतिनिधित्वाचा उपयोग करून घेतला पाहिजे. खया अर्थाने मूलभूत राजकिय कामातून व त्याला रचानात्मक स्वरूप देण्यासाठी आपण कार्यरत होऊन नव्याने एल्गार करुया हीच अपेक्षा हा संदर्भीय लेख लिहण्यामागे आहे.


जय भीम जय भारत. प्रविण मोरे - मुंबई


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com