गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी नाव नोंदणी करावी
-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे
पालघर
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयातून मजूर व कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वत : च्या मुळगावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मणुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नोंदणी तातडीने www.mahaswayam.gov.in या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
केंद्र शासनाच्या CNV Act 1959 (रिक्त पदे सक्तीने अधिसुचीत करणारा कायदा) नुसार राज्य शासकीय , निमशासकिय अस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यालयास (एम्प्लॉयमेंट ऑफिस) आता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे नामकरण करण्यात आलेल्या कार्यालयास कळविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. सबब आपल्या आस्थापनांमध्ये रिक्त असणारे व यापुढे रिक्त होणारे पदे शासनाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसुचित केल्याशिवाय भरती करू नये तसं केल्यास कायद्याचे उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना कायदेशीर कार्यवाहीस पात्र होणार आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्हयामध्ये Online Virtual Job Fair चे आयोजन तात्काळ करावयाचे असल्याने आपल्या आस्थापनेमध्ये असलेल्या रिक्त पदांचा तपशिल www.mahaswayam.gov.in वेबसाईटवर नोंदविला जाईल व ज्या बेराजगरांनी नाव नोंदणी केली आहे ते त्या पदासाठी आपला पर्याय Online नोंदविता येणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्व माहिती उद्योजकांस उपलब्ध होईल त्यानुसार उद्योजक उमेदवारांची Online किंवा प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करणार आहे. तरी जिल्हयातील सर्व आस्थापनांनी आपल्या रिक्त जागा दि. २६/०६/२०२० पर्यंत नोंदणी करून या कार्यालयाच्या palgharrojgar@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावा असेहि आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या