महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल - अँड आशिष शेलार
मुंबई
11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी 8 लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 म्हणजे 40% विद्यार्थी नापास करणार? म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार! महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल., असे माजी शिक्षण मंत्री आमदार, अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, तुम्ही "सरासरी" वागलात तरी तरुणांचे आयुष्य "सरासरी" उध्वस्त होऊ देणार नाही!
मुंबई विद्यापीठात अंतिम वर्षाला 2 लाख 3 हजार 700 विद्यार्थी असून त्यातील 73 हजार एटीकेटी असलेल्या 35.83%विद्यार्थ्यांना नापास करुन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही.
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या 2 लाख 25 हजार 124 विद्यार्थ्यांपैकी 43.41% म्हणजे 1लाख विद्यार्थी एटीकेटीचे,तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 70 हजार 234 पैकी एटीकेटी असलेले 35 हजार म्हणजे 49.83%विद्यार्थी आहेत. गोडवांना विद्यापीठात 24 हजार विद्यार्थी असून त्यातील 16 हजार म्हणजे 66.66% एटीकेटी असलेले तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 70 हजार विद्यार्थ्यांपैकी 30% म्हणजे 21 हजार एटीकेटी असलेले विद्यार्थी आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात अंतीम वर्षाला 73 हजार 506 विद्यार्थ्यांपैकी 42%म्हणजे 30 हजार 828 विद्यार्थी एटीकेटी असलेले तर सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात 38 हजार विद्यार्थ्यांपैकी 50%म्हणजे 19 हजार एटीकेटी असलेल्यांना नापास करणार. औरंगाबादच्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 हजार 521 विद्यार्थ्यांपैकी 12.46% म्हणजे 9 हजार161 एटीकेटी असलेल्यांना, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात 35 हजार 500 पैकी 42.25% म्हणजे 15 हजार एटीकेटी असलेल्यांना नापास कराल. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 46 हजार 466 विद्यार्थ्यांपैकी 38.34% म्हणजे 17 हजार 819 विद्यार्थी एटीकेटी असलेले, तर एसएनडीटी मध्ये 14 हजार 839 विद्यार्थ्यींनीपैकी 30.32% म्हणजे 4 हजार 500 एटीकेटी असलेल्यांना नापास करणार तर संघर्ष करावाच लागेल! असे आमदार, अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या