Top Post Ad

प्रशासकीय सत्ता जातीय हल्ल्याना योग्य न्याय देण्यास पुढे येत नाही


  महाराष्ट्रात नेहमीच विविध जातिसमूहावर हल्ले होण्याच्या घटना घडतांना दिसतात.. कोणताही हल्ला हा पूर्व नियोजित असतो, त्याला पाठबळ असते, हल्ला करणाऱ्या जातिसमूहाचे (त्यातल्या काही गुंड प्रवृत्तीचे ) समर्थन असते, त्यामागे असते जातीय सरंजामी मानसिकता. यंत्रणेचे समर्थन असते, किंवा यंत्रणेच्या दृष्टीतून तो हल्लाच नसतो. राजकीय दबावापोटी पीडितांचे जबाब घेतले जात नाही उलट पिडीतांवरच दबाव टाकून प्रकरण मिटविण्यास भाग पाडले जाते. एकूणच प्रशासकीय सत्ता हि जातीय मानसिकतेतून झालेल्या हल्ल्याना योग्य न्याय देण्यास पुढे येत नाही ते त्यांच्या मालकांशी इमान राखतात.

हे हल्ले होण्यामागची काही कारणे असतात का ?
पूर्वी पासूनच इथल्या नाडलेल्या समाजाचे पौराणिक काळापासून ते आजपर्यंत शोषण होत आलेले आहे व होत आहे. जे या शोषणाच्या विरुद्ध आवाज उठवतात त्यांना मोठ्या प्रमाणात अशा हल्ल्याना तोंड द्यावे लागते. पौराणिक कथेतील शंबुक ते एकलव्य, १९ व्य शतकातील चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर गावोगावी झालेले महार समाजावरील हल्ले, तर २१ व्य शतकात खैरलांजी ते अरविंद बनसोड हत्या प्रकरण आणि विराज जगताप हत्या (विराज जगतापची हत्या हि प्रेम प्रकरणातून झाली असली तरी ती मानसिकतेतून झालेली हत्या आहे ) भीमा कोरेगाव प्रकरणात तर आपल्या लढवय्या पूर्वजाना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अलुतेदार, बलुतेदार, दलित, मुस्लिम, शीख अशा समाजावर ठरवून हल्ला करण्यात आला. त्या हल्लेखोरांची नावे जाहीर करूनही त्यांना अजून सरकार हात लावत नाही. मग ते सरकार बीजेपी चे असो अथवा आताचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना चे असो. हल्लेखोरांच्या, दंगल करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार का उभे राहते? का त्यांना कायद्याच्या धाक दाखवत नाही? का त्यांच्यावर कार्यवाही होत नाही? ते सरकारचे जावई असतात का?

जो समाज दबलेला आहे, सत्ताधाऱ्यांचा गुलाम आहे, त्यांची चाटुगिती करतो, त्यांच्या तालावर नाचतो, त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानतो, त्यांचा वेठबिगार म्हणून राबतो, झालेला अन्याय निमूटपणे सहन करतो, समाजहितापेक्षा स्वतःच्या हित पाहतो, सत्ताधार्यांना असा गुलाम समाज आवडतो कारण अशा गुलामांकडून त्यांच्या सत्तेला धोका नसतो. सत्ता धाऱ्याना भीती वाटते ती अन्यायाविरद्ध बोलणाऱ्यांची, मोर्चे आंदोलने करणाऱ्यांची, समाजजागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांची, कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या पुढार्यांची, सामाजिक समता निर्माण करण्यासाठी वैचारिक खाद्य पुरविणाऱ्या लेखकांची, साहित्यिकांची, कवींची, शाहिरांची, म्हणून सत्ताधारी याना सांम दाम,दंड, भेद वापरून याना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात. समाजातील काही लोक त्यांचे भाट होतातही. त्यांच्या पालखीचे भोई होण्यात धन्यता मानतात. त्याचा वयक्तिक स्वार्थ असतो त्यात. पण सारेच काही सत्ताधार्यांना घाबरत नाही, व्यवस्थेला शरण जात नाही.

जे समाज समूह होणाऱ्या अत्याचाराला सरकारला, सत्ताधार्यांना जाब विचारतात, त्या विरोधात संघटित होतात, जनजागृती करतात, मोर्चे आंदोलने करतात अशा जागृत समाजसमूहाला दडपून टाकण्यासाठी त्या समाजावर हल्ले केले जातात. आंबेडकरी समूह हा सातत्याने समाजातील अन्याला वाचा फोडत आला आहे, आद. बाळासाहेब आंबेडकर हे भारिप - बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सतत सर्वहारा शोषित वंचित समाजाचे प्रश्न ते राजकीय पटलावर मांडत आले आहेत , ते प्रश्न मग विध्यार्थ्याचें असो, शेतकऱ्यांचे असो, आदिवास्यांचे असो, इतर जातिसमूहांचे असो, बौद्धांचे असो, भटक्या विमुक्तांचे असो, आणि म्हणूनच आंबेडकरी समाज आणि बाळासाहेब आंबेडकर हे प्रस्थापितांचे नेहमी टार्गेट राहिले आहे, बौद्ध समाजाने लढण्याची किंमत मोजली आहे, कोणत्याही समाज समूहावर अन्याय झाला कि आंबेडकरी समूह त्या विरोधात आवाज उठवतो, मोर्चे आंदोलने करतो, प्रस्थापितांच्या दबावाला आणि पॉलिसी अत्याचाराला बळी पडतो, प्रसंगी कार्यकर्ते जेल मध्ये जातात, पण हा समाज अन्यायाला भीक घालत नाही.

आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इतर समाज समूह हा जागृत होऊ लागला आहे, तो राजकीय सत्तेतली घराणेशाहीआणि त्या राजकीय घराणेशाहीच्या विरुद्धचा बोलू लागला आहे. सत्तेतील त्याच्या वाट्याबद्दल उघडपणे सत्ताधार्यांना प्रश्न विचारू लागला आहे. वंचित बहुजन आघाडीत सामील होऊन तो स्वतःची ताकत निर्माण करू लागला आहे, स्वतःच सत्तेत बसण्याची भाषा करू लागला आहे. हा सर्वहारा अलुतेदार-बलुतेदार,कारू - नारू, छोटा ओबीसी -भटका-विमुक्त, बंजारा, मातंग, धनगर, आदिवासी, दलित वंचित बहुजन आघाडीत सामील होऊ लागला आहे. वंचित बहुजन आघाडीत हा समूह सामील होतोय सत्तेची भाषा करतोय, या मुळे प्रस्थापितांच्या बुडाला आग लागली आहे. वंचित बहुजन आघाडी अशीच सर्व सामान्य माणसांची आशा ठरू लागली तर एक दिवस प्रस्थापितांना सत्तेतून पायउतार व्हावे लागेल, वंचित बहुजन आघाडीचे सरकार येईल, म्हणून आता बौद्धांबरोबरच जे कोणी सत्तेची भाषा करतील, प्रस्थापितांच्या सत्तेला जो समाज समूह आव्हान देईल त्याच्यावर प्रस्थापितांकडून, त्यांच्या भाटांकडून त्या समाजाला दाबण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे.

हा हल्ला रोखायचा असेल तर
छोट्या छोट्या जातिसमूहाने आपल्यावर होणाऱ्या अन्याला वाचा फोडण्यासाठी पुढे आले पाहिजे, जातीच्या पलीकडे जाऊन समूह म्हणून विचार केला पाहिजे, स्वतःच्या भौतिक आणि सांस्कृतिक विकासाचा मुद्दा पुढे घेऊन जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. स्वतःची राजकीय ताकद निर्माण केली पाहिजे. आपणही सत्तेत जाऊ शकतो हि मानसिकता बाळगली पाहिजे. प्रस्थापितांची भाटगिरी सोडली पाहिजे. जातीचा चष्मां काढून माणुसकीच्या चष्म्यातून सगळ्यांकडे पहिले पाहिजे. मी कोणावर अन्याय करणार नाही, आणि कोणावर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. सत्तेत आता आम्हीच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बसू आणि आम्हीच आम्हाला न्याय देऊ हि भूमिका ठेवली पाहिजे. मागणार्याच्या भूमिकेत न जाता देणाऱ्यांच्या भूमिकेत राहू. हा दुर्दम्य आशावाद बाळगू . राजकीय सत्ता जोपर्यंत हातात घेत नाही तोपर्यंत आपल्यावरील अत्याचार थांबणार नाही.

पवन मारुती साबळे
८१०८७७९७५७







 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com