डीमॅट खाते उघडण्याचा विचार करताय... मग या गोष्टी ठेवा लक्षात
मागील काही वर्षांपासून गुंतवणुकीच्या प्रक्रियेत अमूलाग्र बदल झाला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे गोष्टी प्रचंड गतिमान झाल्या आहेत. आज ई-कॉमर्सचा पर्याय हळू हळू सर्वाधिक पसंतीचा होत आहे आणि शेअर बाजारातही हाच प्रकार दिसतोय. इक्विटी किंवा कर्जांसारखे वित्त व्यवस्थापन करणे दैनंदिन कामे करताना आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. सुदैवाने, १९९६ च्या डिपॉझिटरी कायद्यामुळे प्रत्येकाला काही क्लिक्सवर आर्थिक सुरक्षिततेचे व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. शेअर्स किंवा इतर सिक्युरिटीजच्या प्रत्यक्ष प्रती मिळण्याऐवजी डीमॅट खाते आपल्याला ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यास मदत करते. तेथे आपली आर्थिक सुरक्षितता प्रमाणित इलेक्ट्रॉनिक सिस्टटिमवर ठेवता येते.
डीमॅट खाते म्हणजे काय?
डीमॅट खाते हे बँक खात्यासारखेच असते, रोख रकमेऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्सचा व्यवहार करतात. डिमॅट खाते हे ऑपरेटिव्ह फंक्शनसाठी डिमटेरियलाझेशनची संकल्पना वापरते. डिमटेरियलायझेशनच्या पर्क्रियेत भौतिक शेअर सर्टिफिकेट्स इलेेक्ट्रॉनिक स्वरुपात रुपांतरीत केली जातात. त्यानुसार, डीमॅट खाते हे तंत्रज्ञान वापरून गुंतवणुकदारांचे सर्व शेअर्स एकाच छताखाली जतन करते. यात सरकार, सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड, शेअर्स, बाँड्स इत्यादींचा समावेश आहे.
डीमॅट खाते ऑनलाइन उघडण्यासाठीचे टप्पे:
१. आपल्या पसंतीच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (ब्रोकर)च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. आपले नाव, फोन क्रमांक आणि राहण्याचे शहर ही माहिती विचारणारा सोपा लीड फॉर्म भरा. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आपल्याला एक ओटीपी मिळेल.
३. पुढील फॉर्म मिळवण्यासाठी ओटीपी टाका. आपले केवायसी डिटेल्स म्हणजेच जन्मतारीख, पॅनकार्ड डिटेल्स, संपर्काचा तपशील, बँक खात्याचा तपशील इत्यादी भरा.
४. आता तुमचे डीमॅट खाते उघडले. आपल्याला ईमेल किंवा मोबाइलवर डीमॅट खात्याच्या क्रमांकाचा तपशील मिळेल.
एका गुंतवणुकदाराकडे अनेक डीमॅट खाती असू शकतात. जी एकाच डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)ची असू शकतात किंवा विविध डीपींची अूस शकतात. जोपर्यंत गुंतवणुकदार सर्व अॅप्लीकेशन्ससाठी आवश्यक केवायसी डिटेल्स प्रदान करू शकेल, तोपर्यंत एकापेक्षा जास्त डिमॅट खाती अर्जदाराकडून ऑपरेट केली जाऊ शकतात.
(स्रोत: एंजल ब्रोकिंग)
0 टिप्पण्या