Top Post Ad

... तर गावकरीच पुतळा बसवणार, आक्रमक ग्रामस्थांचा एल्गार

... तर गावकरीच पुतळा बसवणार, आक्रमक ग्रामस्थांचा एल्गार



बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटवल्यानंतर महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, आठ दिवसात महाराजांचा पुतळा बसवला नाही, तर नवव्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार, असा निर्णय पोलिस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटले होते. त्यानंतर आथा शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसांत पुन्हा बसवून देण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे. पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर मणगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून आले. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा निषेध नोंदवत महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा जी यांना केली.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com