Top Post Ad

महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही


 


महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही ,असे मा.रामदास आठवले साहेब यांनी विधान केले आहे…!!
ऐन या वेळीच का? असे विधान केले याचाही विचार जनतेने करावा…!! 
अरविंद बनसोडे प्रकरणी रामदास आठवले बोलले नाही…!!
विराज जगतापची हत्या झाली तेव्हाही रामदास आठवले बोलले नाहीत…!!
लॉकडाऊनच्या आडुन बौद्ध समाजावर अन्याय अत्याचारांचे जणू सत्रच सुरू झाले होते
तेव्हाही रामदास आठवले बोलले नाही…!!

भटक्या विमुक्त आणि आदिवासी,पारधी बांधवांच्या महाराष्ट्रात हत्या झाल्या तेव्हाही रामदास आठवले बोलले नाही…!!


अन्याय,अत्याचारावर तोंड उघडायचे नाही, गरीब हातावर पोट असलेल्या जनतेच्या उपासमारीवर बोलायचे नाही,सत्तेची फळे चाखतं रहायची ही आठवले साहेबांची रीत नवीन नाही. गेली ३०वर्षे महाराष्ट्रातील जनता याचा अनुभव घेत आली आहे…!!
जेव्हा खैरलांजी हत्याकांड झाले तेंव्हाही आठवले साहेब सत्तेत होते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने सत्तेत होते, तुम्ही खैरलांजी गावाला तंटामुक्त पुरस्कार आर.आर. पाटलांनी कोणत्या निकषांवर दिला असे साधे बोलले सुद्धा नाही…!! केव्हा तोंड उघडायचे,का उघडायचे आणि कशासाठी तोंड उघडायचे हे बोलवते धनी ठरवितं असतात. हे आता लपून राहिलेले नाही…!! जेव्हा जेव्हा रिपब्लिकन विचारधारा राजकीय प्लॅटफार्मवर ऊभारी घेते तेव्हा तेव्हा फितुर झालेली माणसे समाजात संभ्रम कसा निर्माण होईल यासाठी तोंड उघडतात हा ३०वर्षाचा अनुभव आहे…!!


रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि गेली ३०वर्षे ते सतत सत्तेचा येथेच्छ आस्वाद घेत आहेत आणि आज तेच म्हणतात की, महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही…!!
तुम्ही रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असुन आणि सतत महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या सत्तेत सहभागी असुनही तुमच्या स्वत:साठी तरी तुम्ही एखादा मतदारसंघ बांधला आहे का..??
गेली ३० वर्षे महाराष्ट्रात एकतरी आमदार विधानसभेत निवडून आणला का.??
एखादी पंचायत समिती,एखादी नगरपरिषद कधीतरी प्रत्यक्ष निवडणूक लढवून ताब्यात घेतली का.??
लोकशाही प्रक्रियेत स्वबळावर कधीच निवडणूक लढविली नाही…!!
रिपब्लिकन विचारधारा मजबूत होईल यासाठी कुठलाच प्रयोग केला नाही…!!
मिळेल तिथुन आणि विचारधारा खुंटीला टांगून सत्तेची मलई मिळविण्यासाठी कोणत्याच विचारधारेचा विधी निषेधही रामदास आठवले साहेबांनी पाळला नाही…!!


कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्वच पक्षांच्या कुबळ्या घेऊन तुम्ही स्वत: एकट्यासाठी सत्तेचा तुकडा मिळवण्यासाठी तुमचा रिपब्लिकन पक्ष गहाण टाकला हे जनतेला माहिती नाही का…??
रिपब्लिकन हे नांव धारण करून रिपब्लिकन विचारधारा संपवण्याचं काम कुणी केलं…??
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरुन सत्तेत सहभागी व्हायचे मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला विचार समाजात रुजू द्यायचा नाही हे पाप कुणी केले..??
म्हणून आता जनता असे म्हणू लागली आहे की,लंका जळून राख झाली या बाबत बिभीषणाने हळहळ व्यक्त करु नये…!!
सत्ताधारी प्रस्थापित पक्ष सत्तेचा तुकडा देतात मात्र त्याची पुरेपूर वसुली सुद्धा करुन घेतात. सहज आणि फुकटात सत्ता द्यायला सत्ताधारी पक्ष राजकीय अडाणचोट आहेत का..??


सत्ताधारी आणि प्रस्थापित पक्षांची लबाडी आम जनतेला समजून चुकली, यांच्या अनैतिक आघाड्या जनतेचा भ्रमनिरास करीत आहेत…!!
यांची घराणेशाही सर्वच राजकीय डोकं असलेल्या नव्या पिढिच्या डोळ्यात सलते आहे…!!
लोकशाही संपवून हूकुमशाही सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागली म्हणून मग इथला सामान्य माणूस आंबेडकरी विचारधारेकडे आषाढभुतपणे पाहू लागला आहे…!!
त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे,ज्यांची ज्यांची रोजीरोटी लॉकडाऊनच्या काळात हिरावली गेली त्या सर्वच समाज घटकांनी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करुन आमच्या रोजीरोटीसाठी आंदोलन करा अशी मागणी केली आहे…!!
भटके विमुक्त आदिवासी पारधी बांधवांच्या हत्येच्या वेळी बाळासाहेब आंबेडकर धाऊन गेले हा अनुभव ताजा आहे…!!
नाभिक समाजाची सलून दुकाने उघडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला…!!


अलुतेदार बलुतेदार समुहाचे प्रश्न घेऊन बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना भेटले आणि त्यांची समस्या सोडवण्याचं आश्वासन घेतले…!!
महाराष्ट्रातील एस.टी.बस सुरू करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केले आणि एस.टी.कर्मचारी वर्गाच्या चुली पेटविण्याचा प्रयत्न केला…!!
हॉटेल व्यवसाईक,छोटे दुकानदार, बॅन्ड पथक, टपरीधारक अशा समाजातील सर्वच घटकांसाठी बाळासाहेब आंबेडकर हे तारणहार म्हणून पुढे येत आहेत हीच बाब लक्षात घेऊन वारकरी सेना यांनी मंदिर उघडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना हाक दिली आहे…!!


महाराष्ट्रातील तमाम जनतेला बाळासाहेब आंबेडकर यांच्या कृती आणि धोरणात आपलं हितं सामावलेलं जाणवू लागले आहे…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला मानवतावादी विचार सगळ्याच हवालदिल नागरिकांसाठी संजीवनी स्वरुप ठरु लागला आहे…!!
ही अवस्था अशीच राहिली तर प्रस्थापित सत्ताधारी पक्षांची दुकानदारी बंद पडेल का.??
या धास्तीपोटी सत्ताधारी पक्ष आपल्या पिंजऱ्यातील पोपटाला बोलायला लावतात…!!
आता अशा संभ्रमीत विधानांना नव्या पिढीने सिरीयसली घेऊ नये अशी अपेक्षा…!!
सत्ताधारी प्रस्थापित पक्षांच्या हितासाठी त्यांची माणसं जाणिवपूर्वक संभ्रम निर्माण करणारी विधाने करतं राहतील त्यांचं वाईटही वाटून घेऊ नका आणि त्यांच्या मताला किंमतही देऊ नका…!!
जयभीम.


-प्रा.भास्कर भोजने.  ( अकोला जिल्हा )  मो:-9960241375,     
जेष्ठ मार्गदर्शक, विचारवंत, राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार


संकलन:-नवनाथ पौळ (केज तालुका प्रतिनिधी : पुरोगामी संदेश : ) मो:-8080942185


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com