संघर्ष नगर मधील रहिवाशांना दहा वर्षात कुठल्याही सोयीसुविधा नाही, बिल्डरविरोधात आंदोलनाचा इशारा
मुंबई (चांदिवली)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बाधित रहिवाशांना पुनर्वसन प्रक्रियेत संघर्ष नगर चांदिवली याठिकाणी घरे देण्यात आलेली आहेत. अनेक ठिकाणाहून रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात एसआरए योजने अंतर्गत नित्कृष्ठ दर्जाची घरे देवून पुनर्वसन करण्यात आले आहे. *विकासक सुमेर बिल्डर* याने दहा वर्षाच्या वर कालावधी होऊन सुद्धा संघर्ष नगर मधील हजारो रहिवाशांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. रस्तरांवरील काळोख, खराब रस्ता, रस्ते साफसफाई आणि दुगँंधी कडे होणारे दुलँक्ष, 1 लाख लोकवस्ती असलेल्या संघर्षनगरमध्ये हाँस्पीटल, स्मशानभूमी नाही, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नाही. पुनर्वसित सुशिक्षीत, बेरोजगार, महिलांना नोकरी उद्योगाची सोय नाही ,सुसज्ज माकेँट, खेळाचे मैदान, मुतारी आणि सुलभ शौचालय आदी प्रश्न गेली 10 वर्ष ऐरणीवर आलेले आहेत.विषेश आणि संतापजनक बाब म्हणजे 1 लाख वस्ती असलेले संघर्ष नगर अजुनही मुंबई महापालिकेच्या ताब्यात नाही.
प्रत्येक वेळी राज्यकतेँ निवडणुका आल्या की भोळ्या भाबड्या जनतेला आश्वासने देतात आणि निवडणूक जिंकले की दिलेली आश्वासने विसरुन जातात. या विरोधात *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)* पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजीराव कांबळे, प्रकाश दाहीजे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विधाते, सिद्धार्थ मस्के,श्याम कांबळे, संदीप साळवे, अजय गायकवाड, रवि सोनवणे आदी पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी संघर्ष नगरच्या प्रश्नांवर निर्णायक लढा तिव्र केला आहे. सुमार बिल्डर्स आणि स्थानिक राज्य़कर्त्याना जाब विचारण्यासाठी सुमार बिल्डर्सच्या कार्यालयावर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचे सविस्तर निवेदन साकीनाका पोलिस ठाण्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री *ना. रामदास आठवले स्थानिक आमदार दिलीपमामा लांडे ,मा.नगसेवक ईश्वर तायडे, एल वाईड विभाग कार्यालय कुलाँ, येथे देण्यात आले आहे.
संघर्ष नगर मधील जनतेच्या जीवन मरणाच्या पुकारलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष संजयराव बोडेँ यांनी केली आहे. कुणीतरी एकदा हे करणे गरजेचे होते. ती रोखठोक भूमिका तानाजीराव कांबळे आणि प्रकारावर दाहीजे व त्यांच्या सहकार्यांनी घेतली आहे मुंबईतील आम्ही सर्व पत्रकार मंडळी या लक्षवेधी उपोषणामध्ये सहभाग घेऊन बिल्डर आणि राज्यकर्त्यांना जाब विचारणार आहोत. असे असे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय बोडेँ यांनी सांगितले
रिपाइंचे राष्ट्रीय महासचिव माजी मंत्री अविनाशी महातेकर, राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे मुंबई अध्यक्ष गौतमभाऊ सोनवणे राषट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर जिल्हाध्यक्ष *विवेकजी पवार, समाजवादी प्रकाश जाधव, जिल्हा सचिव किसन रोकडे, चांदिवलीत तालुका अध्यक्ष बापु प्रधान, योगीराज भोसले,बाबुशा कांबळे, प्रकाश कांबळे, आकाश बागले,आदी वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकाश दाहीजे यांनी दिली.
0 टिप्पण्या