‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ मुळे सकारात्मक बदल होतील
मुंबई
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल भारतीय विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीचा जगातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग मंच ब्रेनलीने विविध शैक्षणिक पातळ्यांवरील ४०३६ विद्यार्थ्यांमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये भारतीय शिक्षण प्रणाली ही नव्या बदलाला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे निदर्शनास आले आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये आधीच लोकप्रिय असल्याचे दिसते कारण, ६६.८% विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती होती. किंबहुना, प्रतिसाद दिलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना वाटते की, शालेय स्तरावर शिक्षण घेण्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ६५.६% विद्यार्थी म्हणतात की, अॅप्स, सॅटेलाइट टीव्ही चॅनेल, ऑनलाइन कोर्सेस इत्यादी विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात. तर एक पंचमांश विद्यार्थ्यांनी याबद्दल खात्री दिली नाही.
सर्वेक्षणात, ६०.३% विद्यार्थ्यांनी कला, विज्ञान इत्यादीसारख्या कठीण शाखांच्या पुढे विषय निवडण्याच्या कल्पनेस प्राधान्य दिले. कारण यामुळे आवडत्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अधिक लवचिकता मिळू शकते. ब्रेनलीच्या यूझर्सपैकी (२०.४%) एक पंचमांश विद्यार्थ्यांनी म्हटले की, त्यांना प्रचलित अभ्यासक्रमच आवडला. तथापि, बहुतांश (५८.७%) विद्यार्थी म्हणाले की, त्यांना सर्वसामान्य स्वीकारार्ह भाषेतच शिकायला आवडेल आणि २४.८% विद्यार्थ्यांनी या उलट कल दर्शवत मातृभाषेत शिकायला आवडेल, असे म्हटले. ७२.७% विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर (उच्च व माध्यमिक स्तर) कृत्रिम बुद्धिमत्ता, डिझाइन थिंकिंग, ऑरगॅनिक लिव्हिंग इत्यादीसारखे विषय शिकण्यात रस दर्शवला. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज करण्याकरिता नव्या युगातील विषयांची ओळख करून देण्याचे नियोजन यात केले आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
कोव्हिड-१९ चा दीर्घकालीन परिणाम आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सक्रिय सहभागाची जाणीव ठेवत, भारत सरकारने नुकतीच एनपी २०२० ची घोषणा केली. यात धोरणात अत्यंत शिस्त असून बहुभाषिय दृष्टीकोन, कौशल्य विकास तसेच डिजिटल लर्निंगवर अधिक भर आहे. वास्तविक जगातील आव्हाने स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना मूल्य आधारीत शिक्षणाच्या प्रोत्साहनातून तयार करणे, हा या मागील उद्देश आहे. या दूरदृष्टीच्या धोरणाला ब्रेनलीच्या यूझर्सकडून भरपूर पाठिंबा मिळाला. तब्बल ८७.७% विद्यार्थ्यांनी या धोरणाकडून सकारात्मक बदल घडण्याची तसेच शैक्षणिक दर्जावरील ताण कमी होण्याची अपेक्षा केली आहे. यावरून असे दिसते की, अधिक प्रगतीशील आणि पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडील संस्कृती अवलंबण्यास वि्दयार्थी इच्छुक आहेत.
ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणाले, “ शिकणा-यांना कठोर, घिसापिटा आणि केवळ ग्रेड्सवर भर देणा-या शिक्षण मॉडेलपासून सुटका हवी आहे. त्याऐवजी, सध्या विद्यार्थ्यांचा एकूण विकास करत संपूर्ण आयुष्यासाठी त्यांना सज्ज करणारी, प्रभावी शिक्षण प्रणाली आवश्यक आहे. ब्रेनलीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना समुदाय-आधारित शिक्षणाच्या मॉडेलद्वारे एकत्र आणून त्यांना सक्षम करतो. किंबहुना, जीवनाविषयी मूलभूत दृष्टीकोन प्रतिबिंबीत करणारा एक जागतिक समुदाय ब्रेनलीने बनवला आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही."
0 टिप्पण्या