मुरबाडच्या आदिवासींना शिधा- किराणासोबत साडी-चोळीसुद्धा!
बहुजन संग्रामचे कोरोना- मदत कार्याने मुरबाडकरांमध्ये आनंदाचे वातावरण
ठाणे,
बहुजन संग्राम या सामाजिक संस्थेचे अनलॉक मदत कार्य अव्याहतपणे सुरु असून रविवारी ३० ऑगस्टला त्याचा सातवा टप्पा टप्पा पार पडला. त्यात मुरबाड तालुक्यातील पोटगाव या दुर्गम गावांतील आणि लगतच्या पाड्यांतील शेकडो आदिवासी कुटुंबांना पोतडीभर जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले . लॉक डाऊनमुळे रोजगार बंद झालेल्या गरीब- श्रमजिवी लोकांना शिधा- किराणाचे वाटप करण्याचे बहुजन संग्रामने एप्रिलमध्ये हाती घेतलेले मदत कार्य सुरूच आहे. यावेळी जनसेवा - जनाधार सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा शुभोत्तमा निर्भवणे यांचा आग्रह आणि विशेष योगदानामुळे आदिवासींना यावेळी शिधा- किरणासोबतच साडी- चोळीचेही वाटप करण्यात आले.त्यावेळी वंचनाग्रस्त आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ठाणे विभाग येथील कार्यकारी अभियंता अरुण निर्भवणे , बहुजन संग्राम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रंजनाताई कांबळे, संघटनेचे महासचिव कामगार नेते दिलीपभाऊ थोरात यांच्या हस्ते सकाळी मुरबाडमधील पोटगाव येथील राजीव गांधी नगर येथे या कार्याची सुरुवात ११ वाजता करण्यात आली. दुपारी १२.३० वाजेपर्यंत आदिवासींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. प्रत्येक गरजू गरीब कुटुंबाला या मदत कार्यातून एक पोतडी दिली जाते. त्यात पाच किलो तांदूळ,पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो मुगडाळ, एक किलो पोहे, एक लिटर गोडे तेल, एक किलो मिठ, एक किलो साखर,पाव किलो चहापत्ती,पाव किलो मिरची, गरम मसाला, हळद , बिस्किटाचे पुडे असे एकूण सामान त्यात असते.
यावेळी संस्थेचे कोकण प्रदेशाध्यक्ष सुखदेव निकम,ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक वाघ, ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना कांबळे, रेल्वे मोटरमॅन विजय पवार, काॅन्ट्क्टर विकी पवार, उपअभियंता विवेक सातपुते ,शाखा अभियंता आर.बी. देगांवकर, पत्रकार राजू कांबळे संस्थेचे ठाणे जिल्हा सचिव विजय सुरवाडे, वंचित बहुजन आघाडीचे मुरबाड शहर अध्यक्ष शंकर गोहिल, उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती रवी महाजन, ठाणे जिल्हा संघटक सुनील खराटे, सुमेध निकम, माई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. मुरबाड तालुक्यातील आदिवासींना शिधा- किराणा आणि साडी - चोळी वाटपाच्या मदत कार्यात जनसेवा जनाधार सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा शुभोत्तमा निर्भवणे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सचिव संपत गायकवाड, खजिनदार खंडागळे,विनायक घरत यांनी विशेष परिश्रम घेतले
मदत कार्य अशोक विजया दशमीपर्यंत चालणार
कोरोना आणि लॉक डाऊनमुळे रोजगार गमावलेल्या गरीब- श्रमजीवी कुटुंबाना शिधा- किराणा वाटपाचे हे मदत कार्य ऑक्टोबरअखेरच्या अशोक विजया दशमीपर्यंत चालणार आहे, अशी घोषणा बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी यावेळी केली. किमान १० हजार गरीब कुटुंबाना मदत करण्याचा आमचा संकल्प असून या मानवतावादी कार्याला सार्वजनिक बांधकाम, जीवन प्राधिकरण, महसूल विभाग, महावितरण , महानगरपालिका येथील अधिकारी, कर्मचाऱ्यानी मोलाचे सहकार्य दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या