कांदा निर्यातबंदी निर्णयाच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने
ठाणे
सद्यस्थितील कोरोना संक्रमणामूळे आधीच बेजार झालेल्या देशांतील शेतक-यांनी प्रचंड मेहनत करून मोठया प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले व आता कांदा परदेशात निर्यात करून हातात चार पैसे मिळण्याची वेळ आली असता घुमजाव करित केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा जाचक निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे भाव कोसळत आहेत याचा निषेध करीत ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यानी १६ सप्टेंबर रोजी जिल्हाध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने केली.
ठाण्यातील स्टेशन रोड येथील शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या या आंदोलनात शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे,महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने,सुखदेव घोलप,शहर काँग्रेस सरचिटणीस अॅड झिया शेख,शिरीष घरत, प्रसाद पाटील,महेद्र म्हात्रे,विजय बनसोडे,मंजूर खत्रि,धर्मवीर मेहरोल,रमेश इंदिसे,हिन्दुराव गळवे,राजू शेट्टी,हेमांगी चोरगे,युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष गिरी,मेहेर चौपाने,विनीत तिवारी,दिपक पाठक,निर्मला जोशी,डाॅ.जयेश परमार,अंजनी सिंग,पप्पू सिंग,उमेश सिंग,निजाम शेख,विश्वनाथ कीरकीरे,राजू हैबती,तोकीर शेख,आसद चाउस,सुभाष ठोम्बरे,आदि सर्व शहर पदाधिकारी,सर्व विभाग अध्यक्ष, पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की,एकीकडे कोरोनाचे सावट,त्यातुनही शेतकर्यानी काद्याची पीके काढली आणि सरकारने काद्यावरच निर्यातीची बंदी घातली यामूळे शेतकरी वर्गासाठी मोठा धक्काच असून केद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामूळे शेतकरी वर्गासाठी आत्म्यहत्या शिवाय पर्यायच राहणार नाहीये सरकार बोलतय की, देशातच कांद्याची विक्री केली पाहिजे पण आपल्या कडे मोठ्या प्रमाणावर शेतकर्यानी काद्याची पिके घेतलीत त्यामूळे हा उत्पादीत केलेला कांदा शेतकर्राना फेकून द्यावा लागेल यामूळे शेतकरी वर्ग रस्त्यावर येईल म्हणून केद्र सरकारने कादा निर्यात बदी बाबत जो निर्णय घेतलाय तो त्वरित मागे घ्यावा व शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.
0 टिप्पण्या