असुरक्षित वालाराम वाटिकेचे भवितव्य अंधारात
पोलिसांना वाटते गंगूबाईची खानावळ....
टिटवाळा
येथील वालाराम वाटिका सी विंग रूम नं २१२ मध्ये १२ सप्टेंबर रोजी भर दुपारी काही रोकड व मंगळसुत्र चोरांनी लंपास केले. सदर घटनेची माहिती संबंधित व्यक्तीसह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो पोलिसांनी तक्रारदारांचाच उलट तपास केल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या व्यक्तीच्या घरी चोरी झाली त्याची फेरतपासणी तर केलीच परंतु पत्रकारांना देखील इथे पत्रकारीता करू नका? ही काय गंगूबाई ची खानावळ आहे का? अशा भाषेत सुनावले.
वालाराम वाटिकेत अनपेक्षित गंगूबाईची खानावळच चालते. वाटीकेच्या ६ विग त्यापैकी ई/एफ पुणँपणे पडीत खंडर आहे तिथे नशेबाज, बाईलवेडे, प्रेमी युगुल यांचा वावर सराँस सुरू असतो. अनैतिक कामे घडतात, वालाराम वाटिकेला सुरक्षा कवच नाही या अगोदर देखील या संदर्भातील माहिती स्थानिक पातळीवर टिटवाळा पोलिसांना दिली आहे. परंतु अद्याप या भागात पेट्रोलिंग झाली नाही आणि आता तर लाँकडाऊन मूळे बेकारी वाढली आहे त्याचा फटका गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार होवून चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे.
तसेच गणेश वाडी वालाराम वाटिका बिल्डर हरीश भानुशाली हा सीविल केस मध्ये फसला आहे लोकांची दिशाभूल करून त्यांना दिलेली आश्वासने अद्यापही बिल्डर ने पुर्ण केलेली नाहित. ई/एफ बिल्डिंग खड्ड्यात ढकलून बिल्डरने लोकाची फसवणूक केली आहे. बिल्डरच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. याची नोंद पोलिसांना हि ठाऊक असावी म्हणूनच त्यांनी गंगुबाईची खानावळ आहे का असा प्रश्न विचारला असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. पोलीसांना आणि टिटवाळा पोलीस स्टेशन ईनचार्ज बालाजी पांढरे यांना निवेदन आहे की अशा पद्धतीने तक्रारदारांशी आणि पत्रकारांशी हुज्जत घालू नये, तसेच उजाड वाटीकेच्या वनात पेट्रोलिंग करावी आणि गंगूबाईच्या खानावळीची चौकशी करावी. जेणेकरुन सभोवताली असलेल्या भुरट्या चोरांना जबरी वचक बसेल. पोलिस आणि पत्रकार हे विरोधी पक्ष आहेत का? ज्यांना गंगूबाई ची खानावळ वाटते, अश्या अधिकार्यांनी एकदा तरी त्या खानावळीत जेवणाचा स्वाद घ्यावा, असे मत येथील रहिवाश्यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या